जावळी

कुडाळच्या माजी विद्यार्थ्यांकडून मोफत गणवेश वाटप : समाजसेवेचे आदर्श उदाहरण म्हणून उपक्रमाची योजना

कुडाळ ता. 6 महाराजा शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कुडाळ येथे दहावीच्या बॅच 2010 मधील माजी विद्यार्थ्यांनी एक सामाजिक बांधिलकी जपत शाळेच्या इयत्ता सहावी ते आठवीतील 20 गरजू विद्यार्थी वविद्यार्थिनींना मोफत गणवेश वाटप केले. समाजसेवेचे आदर्श उदाहरण म्हणून ह्या उपक्रमाची योजना माजी विद्यार्थ्यांच्या गेटटुगेदरच्या कार्यक्रमातून करण्यात आली, आयोजित गेटटुगेदरवेळच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत जमा झालेल्या निधीतून त्यांनी गरजवंत 20 विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप केले, या उपक्रमामुळे एक सकारात्मक सामाजिक संदेश पसरला असून समाजात एक आदर्श निर्माण झाला आहे.


कुडाळ ता.जावली येथे दहावीच्या बॅच 2010 मधील माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते नुकतेच गरजू विद्यार्थांना गणवेशाचे वाटप करण्यात आले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रभारी मुख्याध्यापक डी.एम.तरडेम्हणाले, माजी विद्यार्थी जेव्हा शाळेत परत येतात आणि शाळेसाठी काहीतरी करतात, यामुळे शाळेबद्दलचे त्यांचे प्रेम आणि आदर, अधोरेखित होत असते, तसेच त्यांच्यामध्ये जी सामाजिक जबाबदारीची भावनाही यानिमित्ताने वाढलेली पहावयास मिळते, माजी विद्यार्थ्यांचे असे कार्य पाहून इतर माजी विद्यार्थी आणि समाजातील इतर लोकांनाही हे प्रेरणादायी ठरणार आहे. यावेळी अवधूत खटावकर, स्वप्निल शेवते, सौरभ म्हेत्रे, प्रशांत शिंदे या माजी विद्यार्थ्यांनी बॅचच्यावतीने प्रतिनिधित्व करत गणवेशाचे वाटप केले.

माजी विद्यार्थी प्रशांत शिंदे बोलताना म्हणाले, काही कुटुंबांना गणवेश खरेदी करणे शक्य नसते, ज्यामुळे त्यांच्या मुलांना शाळेत जाण्यास अडचणीयेतात ,गरजू विद्यार्थ्यांना या निमित्ताने गणवेश मिळतात, ज्यामुळे त्यांना शिक्षण घेण्यास प्रेरणा मिळते, गणवेशामुळे शाळेतील सर्व विद्यार्थी समान दिसतात, ज्यामुळे त्यांच्यामध्ये एकता आणि समतेची भावना वाढते.
भविष्यातही शाळेसाठी अनेक आवश्यक उपक्रम बँचच्या माध्यमातून राबवणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. विद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि त्यांच्या आदर्श कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील ह्या उदात्त कार्याची विशेष प्रशंसा केली. माजी विद्यार्थ्यांचे स्वागत अनिल कांबळे यांनी केले. यावेळी विद्यार्थी मनोगत कुमारी अनुष्का शेवते, हिने तर शिक्षक मनोगत श्रीमती कुंभार यांनीव्यक्त केले कार्यक्रमाचे आभार सैा.साळुंखे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button