जावळीराजकीय

कावडीला आज “विकासाच्या उत्सवा”सह महिला भगिनींचा गौरव – वसंतराव मानकुमरेंच्या मार्गदर्शनाखाली भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन – संदिप परामणे यांची माहीती

कुडाळ ता. 28 – कावडी ता. जावली येथे आज रविवार दि. २९ मार्च रोजी दुपारी ४ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भव्य महिला सन्मान सोहळा होत आहे. ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र दीपक फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशाच्या गजरात मान्यवरांच्या उपस्थितीने महिला माता-भगिनींचा गौरव होणार आहे. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत जावली तालुक्यातील कावडी या गावाने विकासाचा उत्सव साजरा करण्यासाठी पाच कोटींचे बक्षीस मिळवण्याची शपथ घेतली असून लोकसहभागातून संपुर्ण गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे, पर्यटकांसाठी जावली तालुक्यात नवी संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार असून हे गाव ठरणार आदर्श व समृद्ध गावचे रोल मॉडेल ठरणार आहे. आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या वतीने व मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान सोहळा कावडी येथे होणार आहे.

जावळी तालुक्यात अनेक माता-भगिनी महिला कर्तबगार आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी नावलौकिक प्राप्त केलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ही त्यांची वर्णी लागलेली आहे. निसर्गरम्य जावळी तालुक्यातील कावडी या ठिकाणी या सोहळ्याला ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह खासदार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, वन अधिकारी अमोल सातपुते,माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, माजी आ. सदाशिव सपकाळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, भाजप जावली तालुकाध्यक्ष संदीप परामणे, भाजपचे सर्व पदाधिकारी, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व आजी माजी पदाधिकारी, जावली पंचायत समितीचे सभापती सौरभ शिंदे, उपसभापती गोरख महाडिक, सर्व सदस्य, जावली तालुक्यातील सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्याला अभिनेत्री संजना काळे व अभिनेते संदीप पाठक यांच्या मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्याला सन्माननीय कर्तबगार महिलांचा सन्मान होत असल्याने सर्व माता-भगिनींमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. कावडी तालुका जावळी या ठिकाणी होणाऱ्या या या भव्यदिव्य पहिला सन्मान सोहळ्याला सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वसंतराव मानकुमरे यांनी केले आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून करहर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button