जावळीराजकीय

कुडाळ येथील अंतर्गत रस्त्यालगत अखेर मुरमीकरण – सैारभ शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर सावर्जनिक बांधकाम विभागाकडून दखल

कुडाळ ता. 16 – गेल्या अनेक दिवसापासून वाहतूकदारांसह विद्यार्थी यांना त्रास सहन करावा लागत असलेल्या कुडाळ गावातील अंतर्गत रस्ता डॉक्टर माने हॉस्पिटल ते इंदिरानगर या रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या साईट पट्ट्यावर अखेर मुरमीकरण करण्यात आले. सदरच्या रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्या असल्याने तसेच पावसामुळे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना तसेच विद्यार्थ्यांना जाताना आपला जीव मुठीत घालून जावे लागत होते,

सदरचा रस्ता हा उतारानजीक अत्यंत धोकादायक झाला होता, या रस्तावरून महाराजा शिवाजी हायस्कूल ला शेकडो विद्यार्थी चालत जात होते, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र सुध्दा याच रस्तायवर असल्याने या रस्तायवर नेहमी वर्दळ असते, सदरचा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येत असल्याने या अंतर्गत रस्त्याचे काम व्हावे तसेच रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या साईड पट्ट्या तात्काळ भरण्यात याव्यात यासाठी विद्यार्थी वर्गाकडून व नागरिकांकडून मागणी होत होती, दोन दिवसांपूर्वी कुडाळ येथील नागरिक धनंजय केंजळे यांनीही ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सरपंच सैा. कुंभार तसेच प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ बाबा शिंदे यांना सदरच्या रस्त्याचे काम त्वरित करण्याबाबत मागणी केली होती त्यानंतर सौरभ बाबा शिंदे यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार आपण तात्काळ सदरच्या रस्त्याचे दुतर्फा मुरूम टाकून साईड पट्ट्या भराव्यात व खड्डे बुजवावेत असे अधिकाऱ्यांना आदेश दिले होते त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन सदरच्या रस्त्याचे काम करून वाहनधारकांची तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली सदरच्या रस्त्याचे काम मार्गी लागल्याने ग्रामस्थांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button