जावळीराजकीय

जावळी पंचायत समितीच्या गटनेतेपदी सैारभ शिंदे यांची निवड :नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली मोठी जबाबदारी

कुडाळ ता. 24: जावळी तालुक्याच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. भारतीय जनता पार्टीच्या जावली पंचायत समितीच्या गटनेतेपदी कु़डाळ गणातून विजयी झालेले पंचायत समिती सदस्य व प्रतापगड साखर कारखान्याचे अध्यक्ष सैारभ शिंदे यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या महत्त्वाच्या नावांची घोषणा करण्यात आली. तसेच जावळी पंचायत समितीच्या गटनेते पदी अधिकृत निवड झाल्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.


सातारा येथील नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरूची या निवासस्थानी पंचायत समिती सदस्यांची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजपाचे नवनिर्वाचित सदस्य गोरख महाडीक व सैा.चारूशिला पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नामदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सदस्यांना मार्गदर्शन करताना आगामी काळातील कामाची दिशा स्पष्ट केली आणि पक्ष संघटना मजबुतीसाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा केली. बैठकीत मार्गदर्शन करताना नामदार भोसले म्हणाले, “तुम्ही सर्वजण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपाच्या ध्येयधोरणांमुळे विजयी झालेले आहात. तुम्ही निवडून आल्यामुळे आता खरी जबाबदारी सुरू झाली असून, सर्व सदस्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना व समाजातील विविध घटकांना न्याय दिला पाहिजे. पक्षाचे काम प्रामाणिकपणे व अधिक जोमाने तळागाळापर्यंत पोहोचवा.” तसेच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवावेत आणि ज्या कार्यकर्त्यांनी विजयासाठी मेहनत घेतली आहे, त्यांनाही न्याय द्यावा अशा सूचनाही भोसले यांनी यावेळी दिल्या.

सैारभ शिंदे यांच्या निवडीमुळे जावली पंचायत समितीत सत्ताधारी पक्षाची पकड अधिक मजबूत होणार असून, अनुभवी नेतृत्वाखाली तालुक्याचा विकास वेगवान होईल, असा विश्वासही व्यक्त केला. सैारभ शिंदे यांच्या निवडीमुळे तालुक्यातील मान्यवरांसह कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button