
कुडाळ ता. 30 – कुडाळ ता.जावळी येथील सकल नाभिक समाजाच्या वतीने नाभिक समाजाचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

गावातील पवार आळी येथील श्री साईबाबा मंदिरात संत सेना महाराज व श्री विठ्ठल रूक्मीणी यांच्या मूर्तीला सकाळी अभिषेक करून विधिवत पूजा- अर्चा करण्यात आली. भजन, आरती झाल्यानंतर गावातून भव्य सजविलेल्या पालखीमधुन श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीच्या प्रारंभी श्री संत सेना महाराज यांना सकल नाभिक समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. नंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी प्रसिध्द किर्तनकार यांचे किर्तनही झाले यावेळी कृपा त्या पांडुरंगाची भजनी मंडळातील बाल किर्तनकारांनी आपल्या भजनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले

तसेच श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त नाभिक समाजातील जेष्ठ सभासदांचा सत्कारही यावेळी करण्यात आला, कार्यक्रमानंतर महाप्रसादाचेही आयोजन नाभिक समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी समाजातील राजाराम पवार, रामचंद्र श्रीपती पवार, ज्ञानेश्वर किसन पवार, सुरेश मारुती पवार, निवृत्ती बाळकृष्ण पवार, गंगाराम आबाजी पवार, गुलाब भिकू शिंदे, गोपाळ खंडू पवार, भिकू धर्मू पवार, प्रकाश म्हातेकर, प्रताप पांडुरंग पवार यांच्यासह अनेक समाज बांधव व ग्रामस्थ महिला उपस्थित होते.




