
कुडाळ ता. 17 – आर्ट ऑफ लिव्हिंग जावली संचलित श्रावण महिन्यातील रुद्रपूजा येथील कुडाळ ता.जावली केंद्राद्वारे श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर मंदिर येथे रविवार ता.17 रोजी सायंकाळी विशेष संकल्पपूर्ती रुद्रपुजा व शिवमय सत्संग आयोजित करण्यात आला होता. कुडाळ सह तालुक्यातून आलेल्या सुमारे ५०० हून अधिक भाविकांनी ह्या वेळी रुद्रम् मंत्राच्या सानिध्यात गहन ध्यानाचा अनुभव घेतला. समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी, नैराश्य घालवून सकारात्मक ऊर्जा प्रस्तापित करणाऱ्या साठी ह्या विशेष संकल्पपूर्ती रुद्रपुजा चे आयोजन केले गेले. आर्ट ऑफ लिव्हिंग बँगलोर आश्रम वरून आलेले स्वामी महेश टकले व वेद पंडित प्रशांत व प्रिन्स यांच्या सानिध्यात ही रुद्रपूजा व सत्संग झाला.

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही संकल्पपूर्ती व मंत्रस्नानाची अनुभूती घेण्यासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली, आर्ट ऑफ लिव्हिंग सत्संग समूह,जावली ह्यांनी शिवमय भजन भक्तिगीते व वाद्य तालावर सर्वांना मंत्रमुग्ध केले. सर्वांचे ह्या उत्सवाचे अनुभव खूप अनमोल अद्भुत होते. सर्व आनंदाने भारावून गेले होते कार्यक्रमानंतर प्रसाद चा ही आस्वाद सर्व भाविकांनी घेतला.
डाँ राजेंद्र माने यावेळी बोलताना म्हणाले, रुद्रपूजा हा भगवान शंकराचा अभिषेक करण्याचा एक धार्मिक विधी आहे. ज्यामध्ये शिवलिंगाला अभिषेक केला जातो या पूजेमध्ये, शिवलिंगाला विविध वस्तूंचा॰ अभिषेक केला जातो, आर्ट ऑफ लिव्हिंग जगभरात करत असलेल्या सेवा उपक्रमाचे प्रदर्शन या रूद्रपूजेच्या निमित्ताने जावलीकरांनी अनूभवले, आर्ट ऑफ लिव्हिंग व वैदिक धर्म संस्थान ह्यांनी हा श्रावण भर रोज अशा अनेक ठिकाणी रूद्र पूजा आयोजित केल्या आहेत. हजारो लोकांना ह्या रुद्रपूजा चे अदभुत अनुभव येत आहेत. दर वर्षीप्रमाणे हा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंच्या सर्व सदस्यांचे व स्थानिक ग्रामस्थ, महिलांचे मोठे मोलाचे योगदान लाभले.





