जावळीसामाजिक

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत दिनेश किर्वे यांच्याकडून सामाजिक बांधिलकीचे दर्शन – विद्यार्थांना गणवेश, मतिमंद शाळेसाठी संगणक भेट व गरजूंना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप

कुडाळ प्रतिनिधी : गोरगरीब, होतकरू व वंचित घटकांच्या सेवेसाठी सतत तत्पर असणारे सामाजिक कार्यकर्ते तसेच कुडाळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मा. दिनेश किर्वे यांनी यंदाच्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत पुन्हा एकदा परोपकाराचा आदर्श घालून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला.


कुडाळ येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न् झाल्यावर स्वर्गीय दिपक किर्वेयांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्यकर्ते दिनेश किर्वे यांच्या वतीने महाराजा शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील आठ गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करून त्यांच्या शिक्षण प्रवासात आत्मविश्वासाची नवी उमेद निर्माण केली. “वस्त्रदान हेच विद्यानंदाचे दान” ही भावना या उपक्रमातून प्रकर्षाने जाणवली. याचबरोबर मनमंदिर मतिमंद मुलांची कार्यशाळा येथील विध्यार्थांना संगणक संच भेट देऊन किरवे यांनी अन्नदानाचेही आयोजन केले. मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाश्रू व समाधानाची चमक त्यांच्या या दातृत्वपूर्ण कार्याचे जिवंत चित्र होते.विशेष म्हणजे, समाजातील लहान बालकांच्या संगोपनासाठी अहोरात्र काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका यांना देखील मिकिस सह साहित्याचे वाटप करण्यात आले.

जनसामान्यांची सेवा करणाऱ्या या सेविकांचा किरवे यांच्या हस्ते सत्कार व गौरव करण्यात आला. त्यामुळे सेविकांच्या परिश्रमाची समाजमान्यता अधिक दृढ झाली. तसेच गावातील वंचित व कातकरी व आतर समाजातील गरजू लोकांना जिवनावश्यक वसतू, धाऩ्य व कपडे यांचेही वाटप यावेळी करण्यात आले, गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांची मुले, होतकरू विद्यार्थी तसेच सामान्य नागरिक यांना आर्थिक व वस्तूरूपी मदत करून दिनेश किरवे यांनी समाजमनात भक्कम ठसा उमटवला आहे. ” दिनेश किरवे यांचे कार्य म्हणजे खरी सामाजिक बांधिलकी. त्यांच्या प्रेरणेने अनेकांना समाजासाठी काहीतरी करण्याची ऊर्जा मिळते.” यामुळे किरवे यांची प्रतिमा केवळ समाजसेवकापुरती मर्यादित न राहता, जनसामान्यांच्या मनातील खऱ्या अर्थाने”दयाळू लोकनेता” म्हणून अधिक दृढ झाली आहे असे दिनेश किर्वे यांच्या सामाजिक कार्याबददल लाभार्थ्यांनी व ग्रामस्थांनी एकमुखाने आभार व्यक्त करत या उपक्रमाचे कैातुक केले. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच,सर्व सदस्य तसेच शिक्षक विद्यार्थी, ग्रामस्त, अंगणवाडी सेविका तसेच गोल्डन मित्र समूहाचे सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button