
कुडाळ ता. 16 – शैक्षणिक वर्षाचा शाळांचा पहिला दिवस नवागतांच्या स्वागताने आणि विविध शैक्षणिक उपक्रमाने उत्साहात पार पडला. यावेळी लहान मोठ्या सर्वच मुलांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कुडाळ ता.जावळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र आदर्शशाळा, व अंगणवाडी अशा गावातील अनेक शाळेत नवगतांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारावर नवीन विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे स्वागत पुष्प, खाऊ आणि फुगे देऊन करण्यात आले. वाजत गाजत विद्यार्थी पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ व शिक्षक यांनी नवीन विद्यार्थी यांची दींडी देखील काढली.

सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात झाली. पूर्वी मुलांना शाळेत दाखल करताना मुलांची रडारड असायची, पण या अनोख्या पद्धतीने शाळा प्रवेश झाल्याने मुलांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता.यावेळी मुलांना पाठ्य पुस्तकांचे तसेच शालेय साहित्या व नविन गणवेशाचेही वाटप महसूल अधिकारी संजय बैलकर प्रशांत कदम, ग्राम महसूल अधिकारी दत्तात्रय प्रभाळे, कुडाळ विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मालोजीराव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य विरेंद्र शिंदे, उपसरपंच सोमनाथ कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंद बावकर यांच्या हसेत वाटप करण्यात आले. सदस्य महेश पवार, मुख्याध्यापक जयश्री गायकवाड, आशिष रासकर, तसेच शिक्षकेतर कर्मचारी,ग्रामस्थ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बन्सीधर राक्षे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्तावित संदीप किर्वे यांनी केले तर आलेल्या मान्यवरांचे सचिन पवार यांनी आभार मानले.त्यांनतर पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. आहारात गोड पदार्थही देण्यात आले.





