
कुडाळ ता.18 – मी राज्याचा मंत्री असल्याने संपूर्ण राज्यात कामानिमित्त फिरावे लागत असते, राज्याची जबाबदारी पेलताना कितीही व्यस्त असलो तरी ज्या सातारा जावली तालुक्यातील माझ्या मतदारांनी मला राज्यात विक्रमी मताधिक्याने निवडून दिले आहे आणि खऱ्या अर्थाने येथील जनतेमुळेच मी मंत्री होऊ शकलो या जाणिवेने मी माझ्या मतदारसंघात कायम कार्ततत्पर राहणार आहे, त्यांच्यासाठी कायम हजर राहणार आहे, आजपर्यंत मी कोणत्या गावाची किती लोकसंख्या आहे व किती मतदान आहे याचा विचार कधीही न करता विकासकामे केली आहेत आणि यापुढेही करत राहणार आहे, येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावातील नवीन लाईटचा डि पी बसवण्याचा विषय असो किंवा कुडाळ ते गोपाळ पंथाची वाडी हा रस्ता असो तसेच गावातील सभा मंडप असेल या सर्व विकासकामाची तातडीने कार्यवाही होईल असे अभिवचन देऊन गावातील अखंड हरिनाम सप्ताहाचे निमित्ताने मला सांगता सोहळ्याला उपस्थित राहता आले याचा आनंद असून तालुक्याच्या विकासासह जिल्ह्याचा ही सर्वागीण विकास करण्यात कुठेही कमी पडणार नाही असे अभिवचन नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी बोलताना केले.

गोपाळपंथाचीवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचा सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी नामदार भोसले बोलत होते, कार्यक्रमाच्या सुरुवातीला नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून दीपोत्सव साजरा करण्यात आला यानंतर ग्रामस्थांच्या वतीने नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमास प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ बाबा शिंदे, बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र शिंदे, कुडाळ सोसायटीचे चेअरमन मालोजीराव शिंदे, हभ प सुहास गिरी, जितेंद्र शिंदे, वीरेंद्र शिंदे, भाऊराव शेवते, राहूल ननावरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते, महेश बारटक्के यांनी स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, यावेळी गोपाळ पंथाच्या वाडीचे ग्रामस्थ सयाजी कदम, संतोष मोरे, अनिल शिर्के, वसंत नवले, मुरलीधर कदम, शिवाजी शिंदे, चंद्रकांत मोरे, सर्जेराव कदम, ह.भ.प, रघुनाथ मर्ढेकर महाराज, बाळासाहेब किरवे यांच्यासह ग्रामस्थ,महिला युवक ,उपस्थित होते

