जावळीराजकीय

कुडाळ -करहर रसत्यावर खडडे मुक्तीची मोहीम : प्रतिपंढरपूर करहर आषाढी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाची तात्काळ दखल

कुडाळ ता. 5 – कुडाळ-पाचगणी या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने ये-जा करत आहेत .यात वारंवार पडत असणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. प्रतिपंढरपूर करहर येथील आषाढीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यावरील पडलेले खडड्ंयाची सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेत या रस्ताववरील सर्व खड्डे मुजवण्यास सुरूवात केली,त्यामुळे प्रवाशांसह भाविकांकडून समाधान व्यकत करण्यात आले.


दरवर्षीप्रमाणे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या करहर मध्ये आषाढी एकादशीचा मोठा कार्यक्रम होत आहे. या आषाढी एकादशीच्या कार्यक्रमाला संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यातून वारकरी संप्रदायाचे लोक येत असतात. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर करहर नगरीत हजारो भाविकांची वर्दळ असते. या पवित्र दिवशी कोणत्याही वारकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सज्ज झाले आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना उघड झाल्यानंतर विभागाने ही मोहीम युद्धपातळीवर राबवली आहे. काही दिवसांपूर्वी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक संपन्न झाली होती. या बैठकीमध्ये छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रत्येक विभागाला आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सूचित केले होते त्यानंतर त्यांच्या आदेशानुसार जावली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुडाळ-पाचगणी रस्त्यावरील खड्डे तात्काळ मुजवण्यास सुरूवात केली. अभियंता श्री. अटकेकर यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून खड्डे बुजवण्याचे काम पाहणी सुरू करून थेट खड्डामुक्त रस्ता मोहिम राबविली, यामुळे वाहनचालक व स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button