कुडाळ ता.17 – सातारा- जावली मतदारसंघात कार्यसम्राट आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एक विकासपर्व उभे केले आहे. या मतदारसंघात जेवढी विकासकामे झाली आहेत तेवढी इतर कोणत्याही मतदारसंघात बहुदा झाली नसतील. आपल्या मतदारसंघाचा विकासात्मक कायापालट होण्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंशिवाय पर्याय नाही. आपन सर्वांनी शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. शिवेंद्रसिंहराजेंना महाराष्ट्रात १ नंबरच्या मताधिक्ययाने विजयी करून एक इतिहास निर्माण करा, त्यांना मंत्री बनवण्यासाठी मी प्रयत्न करतो असे आवाहन खासदार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांनी केले.
कुडाळ ता. जावली येथे सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य मेळाव्यात खासदार उदयनराजे बोलत होते. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे, सुनील काटकर, प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, कांचन साळुंखे, शिवसेनेचे एकनाथ ओंबळे, जयदीप शिंदे, जितेंद्र शिंदे, राजेंद्र शिंदे, मालोजीराव शिंदे, विरेंद्र शिंदे, दादा पाटील, शिवाजीराव मर्ढेकर, मछिंद्र मुळीक, सुहास गिरी, प्रशांत तरडे, आरपीआयचे एकनाथ रोकडे, गीता लोखंडे, रोहिणी निंबाळकर, तानाजी शिर्के, रवी परामने, प्रविण देशमाने, यांच्यासह अनेक मान्यवर, महायुती मधील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कुडाळ गटातील हजारो ग्रामस्थ, माता- भगिनी उपस्थित होत्या.
आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, विकासकामाबाबत सांगायला विरोधकांकडे काहीही नाही. एक काम सोडा पण,गेल्या पाच वर्षात जावलीतल्या एकातरी गावात हे विरोधक कधी फिरकले आहेत का? विरोधकांनी प्रतापगड कारखाना सुरु होऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले. आम्ही सर्वांनी मिळून त्यांचे प्रयत्न हणून पाडले आणि जावलीतल्या शेतकऱ्यांच्या हक्काचा कारखाना सुरु केला. माजी आमदार स्वर्गीय लालसिंगराव काका व स्वर्गीय राजेंद्र शिंदे यांचे कारखान्यासाठी मोठे योगदान आहे, त्यांचे योगदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही, आज शेतकऱ्यांच्या उसाचा प्रश्न तर मिटलाच पण, बाजारपेठेत आर्थिक उलाढालीत वाढ झाली. या भागातील अर्थकारणाला गती मिळाली आहे. मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे. कोणाची कसलीही समस्या असो ती मी सोडवतोच. जावलीतील जनतेशी माझी नाळ घट्ट जुळली आहे. त्यामुळे निवडणुकीपुरते उगवलेल्यांना कायमच घरी बसविल्याशिवाय आम्ही राहणार नाही, 23 तारखेनंतर विरोधक त्या पक्षात राहतील का असा प्रश्न उपस्थित करून त्यांच्या खोट्या कांगाव्याला न भुलता सर्वांनी कमळ या चिन्हापुढल बटन दाबून मला विक्रमी मतांनी विजयी करा, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.
आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठीशी सर्व जनता खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे विरोधकांचे डिपॉझिट जप्त होणार आहे, असे मानकुमरे म्हणाले. यावेळी सौरभ शिंदे बोलताना म्हणाले, विरोधक कोणत्याही पक्षाशी वा त्यांच्या नेत्यांशी एकनिष्ठ राहू शकले नाहीत ते जनतेशी काय एकनिष्ठ राहणार, महिन्यात चार पक्ष बदलणाऱ्यांना जनता यावेळी कामचे घरी बसविल्याशिवाय राहणार नाही, आमदार भोसले यांनी प्रतापगड कारखाना सूरू करून जावलीतील सहकार वाचवला आहे, कुडाळ जिल्हा परिषद गटात कोट्यावधींचा विकासनिधी देऊन तालुक्याचा चेहरामोहरा बदलला आहे, त्यांच्या विजयाची केवळ अैपचारिकता बाकी आहे. यावेळी महेश बारटक्के, शाबिर पठाण यांनीही मनोगत व्यक्त करून आ. शिवेंद्रसिंहराजेंना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार केला. जयदिप शिंदे यांनी आभार मानले.
दीपक पवार गटाला खिंडार… सैारभ शिंदेचे जोरदार शक्तीप्रदर्शन
कुडाळ येथील सभेसाठी प्रतापगडचे अध्यक्ष सैारभ शिंदे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत कुडाळची सभा गाजवली,जेसीबीतून फुलांची उधळण, फटक्यांची आतिषबाजी करून हजारो कार्यकर्त्यांची गर्दी जमवली, यावेळी सभेत दीपक पवार गटातील पवारवाडी येथील प्रकाश ढवळे, नागेश ढवळे, राजेंद्र ढवळे, अभिषेक ढवळे, नामदेव ढवळे, सचिन ढवळे, अनिता ढवळे, शंकर ढवळे, मुरलीधर ढवळे, संतोष पवार, विकास ढवळे, श्रीकांत ढवळे, अभिजित ढवळे, निलेश ढवळे, शारदा ढवळे, अमोल ढवळे, शंकर ढवळे, कुडाळ येथील सुशांत वारागडे, राहुल वारागडे, संतोष जाधव, नरहरी वारागडे, उमेश पवार, जितेंद्र जाधव, बैलगाडा शर्यत चालक मालक संघटनेचे पैलवान सतीश भोसले (खर्शी) यांच्यासह अनेकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश करून आ. शिवेंद्रसिंहराजेंना जाहीर पाठिंबा दिला.