जावळीजिह्वाराजकीय

राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार : आमदार योगेश टिळेकर – जावली भाजपाच्या वतीने कुडाळला आोबीसी संवाद मेळावा संपन्न

कुडाळ ता. 7 – लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खोटा नरेंटिव्ह पसरवून विरोधकांनी समाजाची दिशाभूल केली. जातीजाती मध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले.महाराष्ट्रात महायुतीने समाजासाठी केलेले काम समाजा पर्यंत पोहचवण्याचे काम या यात्रेच्या माध्यमातून करत आहे.महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कर्तृत्व मोठे असल्यामुळे पुढील आगामी सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद निश्चित मिळेल.असे प्रतिपादन संत सावता क्रांती परिषद महाराष्ट्र, संघटनेचे अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी केले.


हिंदू बहुजन सन्मान यात्रा महाराष्ट्र दौऱ्यात कुडाळ ता. जावली येथे आयोजित कार्यक्रमात आमदार टिळेकर बोलत होते . यावेळी प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, भाजपाचे निवडणूक संघटक
अविनाश कदम, भाजपा तालुकाध्यक्ष श्रीहरी गोऴे , जावली बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, सरपंच सुरेखा कुंभार, कुडाळ सोसायटीचे अध्यक्ष मालोजीराव शिंदे, माजी उपसभापती रवींद्र परामणे, कारखान्याचे संचालक राजेंद्र फरांदे,प्रदीप तरडे,भाजपा शहर अध्यक्ष विकास गोसावी, उपस्थित होते योगेश टिळेकर म्हणाले,या यात्रेच्या माध्यमातून समाजा पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे.महायुती सरकारने ओबीसी व बहुजन समाजासाठी केलेली कामे समाजा पर्यंत पोहचवण्याची जबाबदारी पक्ष नेतृत्वाने आपल्याकडे सोपवले आहे.मुख्यमंत्री असताना देवेंद्रफडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. परंतु विरोधक सत्तेत असताना त्यांना सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकवता आले नाही. बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी ओबीसी मंत्रालय सुरु केले. भारतीय जनता पक्ष जातीवादी पक्ष असल्याचा खोटा नरेटिव्ह विरोधक पसरवत आहेत परंतु भारतीय जनता पक्ष जातीय वादी केव्हाच नव्हता व नाही. आताच्या महायुती सरकारने विविध जाती जमाती साठी महामंडळाची स्थापना केली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने प्रयत्न केला. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रसिंह राजेंना प्रचंड मतांनी निवडून देऊन महायुतीची सत्ता बहुमताने राज्यात आणण्याचे काम सर्वांनी करावे असे आवाहन आमदार टिळेकर यांनी यावेळी केले .


प्रारंभी सौरभ शिंदे यांच्या हस्ते आमदार टिळेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सौरभ शिंदे म्हणाले, आमदार टिळेकर यांनी आपल्या स्वकर्तुत्वाने राजकारणात यश मिळवले आहे त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटचे विश्वासू सहकारी म्हणून आमदार टिळेकर यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांनी आमचे लोकप्रिय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना पुढील सरकारमध्ये मंत्रीपद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीहरी गोळे यांनी केले. जयदीप शिंदे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button