
कुडाळ ता. 1 – अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्र जन्मस्थळी २२ जानेवारीस विराजमान होणार आहेत. या ऐतिहासिक क्षणानिमित्त अयोध्येतून मंगल अक्षता पूजाविधी करून जावळी तालुक्यातील विविध गावात दाखल झाल्या असून, कुडाळ येथे नुकतेच अक्षतांचे कलशांची पालखीतून मिरवणुक काढून पूजन करण्यात आले. यावेळी जय श्रीराम जय जय श्रीराम च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. जय श्री रामचा जयघोष करत भव्य मंगल कलश यात्रा काढण्यात आली. ठिकठिकाणी या मिरवणुकीचे भव्य स्वागत करण्यात आले.


संपूर्ण जिल्ह्यात अक्षतांचे कलशवाटप केले जात असतानाच जिल्ह्यातील सर्व तालुका प्रतिनिधींना मान्यवरांच्या हस्ते कलश सोपविण्यात आले आहेत, २२ जानेवारीस होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे भव्यदिव्य नियोजन करण्याचे तसेच घरोघरी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा, गल्लोगल्ली दारोदारी प्रत्येक मठ-मंदिरात या उत्सवाचे फलक एलसीडी प्रोजेक्टर तसेच मोठ्या प्रमाणात दिवाळीसारखा हा उत्सव साजरा व्हावा, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही यावेळी आयोजकांकडून करण्यात आले आहे.

यावेळी कुडाळ येथील मुख्य बाजारपेठेत ग्रामपंचायतीसमोर अक्षतांचे मंगल कलश मानाच्या पालखीत ठेवण्यात आले होते, त्यानंतर सर्व मंगल कलशांची पुजा करण्यात आली त्यांनतर व्याख्यानाचा कार्यक्रम करून पालखीतून मिरवणुक काढण्यात आली, पूजनासाठी सर्व सकल हिंदू समाजातील विविध नागरिक, युवा, शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे धारकरी युवक उपस्थित होते.
कुडाळ येथील मुख्य बाजारपेठेत ग्रामपंचायतीसमोर अक्षतांचे मंगल कलश पुजनावेळी व्याख्यानाचाही कार्यक्रम करण्यात आला. ….त्यासाठी खालील व्हीडीआो आवश्य पहा….

