कुडाळ ता. 22 – आगामी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचेच सरकार येणार असल्याचा विश्वास सातारा व जावली तालुक्यातील जनतेला आहे. या सरकार मध्ये सातारा-जावलीचे लोकप्रिय आमदार श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले यांना विक्रमी मताधिक्य मिळावे व त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागावी या सदभावनेने पवित्र श्रावणमासात कुडाळचे जागृत देवस्थान श्री पिंपळेश्वर श्री वाकडेश्वर मंदिरात रविवार दि. 1 सप्टेंबर 2024 रोजी “लघुरूद्र महायज्ञ” चे आयोजन प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सैारभबाबा शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे या धार्मिक विधी निमित्त रविवार दि.01/09/2024 सकाळी ठिक 8 वाजल्यापसून होम हवन, धार्मिक विधी, मंत्रोच्चार, पूजा व त्यानंतर ११.३० वा आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते महाआरती होणार आहे तसेच त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या धार्मिक सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समुह, जावली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
भाजपा जावलीच्या मागणीनुसार बँक ऑफ महाराष्ट्र च्या कुडाळ शाखेतील ekyc सुलभ करणार- शाखाधिकारी सरोजकुमार भगत
भाजपा जावलीच्या मागणीनुसार बँक ऑफ महाराष्ट्र च्या कुडाळ शाखेतील ekyc सुलभ करणार- शाखाधिकारी सरोजकुमार भगत
गणेशोत्सव सण शांततेत, सुरळीत पार पाडावा - सहाय्यक पोलीस निरिक्षक पृथ्वीराज ताटे यांचे आवाहन -"गणराया अवॉर्ड 2024" स्पर्धेचे आयोजन - जावलीत आढावा बैठक संपन्न
गणेशोत्सव सण शांततेत, सुरळीत पार पाडावा - सहाय्यक पोलीस निरिक्षक पृथ्वीराज ताटे यांचे आवाहन -"गणराया अवॉर्ड 2024" स्पर्धेचे आयोजन - जावलीत आढावा बैठक संपन्न
Related Articles
कॅबिनेट मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रराजे भोसले यांचे सातारा जिल्ह्यासह जावलीचे प्रवेशद्वार कुडाळ मधे होणार भव्य स्वागत – सौरभ शिंदे
2 days ago
परभणी जिल्ह्यातील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई करा : किरण बगाडे
1 week ago