जावळीजिह्वाराज्यसामाजिक

मराठा समाजाच्या वतीने सोमवारी मेढा येथे “मोटरसायकल रॅली” -जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बैठकीचे आयोजन

कुडाळ ता. 25 – मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सध्या श्री.मनोज जरांगे पाटिल यांच्या आमरण उपोषणाच्या नवीन भूमिके नंतर महाराष्ट्रभर विविध पडसाद व पाठिंबा पहावयास मिळत आहेत. अनेक ठिकाणी या मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी, समर्थनात साखळी उपोषण, आमरण उपोषण, रास्ता रोको, मोटरसायकल रॅली त्याचबरोबर विविध शासन स्तरावर निवेदन सुरू देणे सुरू आहे. मराठा समन्वयक व तालुक्यातील विविध लोकांच्या झालेल्या चर्चेनुसार सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी ठीक ११-०० वाजता भैरवनाथ मंदिर मेढा आवारामध्ये मराठा समाज बांधव सर्वजण एकत्र येणार आहेत. त्या ठिकाणी बैठक होऊन आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असून त्याच सोबत आलेल्या सर्व बांधवांची प्रशासनाला निवेदन देण्यासाठी मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे अशी माहीती सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजकांनी दिली आहे.

जावळी तालुक्यात आजवर मराठा आरक्षणासाठी झालेल्या सर्वच उपक्रमात सर्व मराठा बांधवांनी अतिशय मोलाचे योगदान दिलेले आहे. आता गरज आहे की हा मराठा आरक्षणाचा सगळ्यात मोठा एल्गार सुरू आहे.त्याला पुन्हा एकदा जावळीतून बळ देण्याची गरज आहे.जेणेकरून आरक्षणाचा हा लढा पूर्णपणे यशस्वी होऊन आरक्षण मिळेल. यासाठी सदरच्या मिटींगचे आयोजन करण्यात आले असून रॅलीमध्ये सर्व युवक, महिला माता-भगिनी तसेच जेष्ठ मराठा बांधवांनी सहभागी व्हायचे आहे. अशा पद्धतीची प्रसिद्धी संपूर्ण तालुकाभर करायची आहे. त्यासाठी आपण पूर्ण ताकदीने प्रयत्न करावेत. असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यानच्या काळा मध्ये सोमवार पर्यंत कुडाळ, मेढा,वेण्णा दक्षिण, केळघर,बामणोली व सायगाव विभागातील सर्व मराठा बांधवांनी आपापल्या विभागात मीटिंग घेऊन त्यांना सोमवारच्या या मोटरसायकल रॅली व मीटिंग संदर्भात माहिती द्यावी आणि आपल्या भागात जागृती करावी.असेही आवाहनही करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button