जावळीजिह्वासामाजिक

शामराव धनावडे यांचा गौरव सोहळा संपन्न –विशेष पुरस्कारने सन्मानित


मेढा प्रतिनिधी :- आपण एखाद्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ठ काम करत असताना विशेष कार्याची दखल घेऊन सन्मानित करण्यात येते.
करंजे तर्फे मेढा तालुका जावळीचे कै सखाराम बापू धनावडे यांचे सुपुत्र श्री. शामराव (आण्णा) सखाराम धनावडे हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा मध्ये गेली २५ वर्ष बस चालक या पदावर सेवा करत आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून २५ वर्ष विना अपघात सेवा देणाऱ्या बस चालकांना विशेष पुरस्कारने सन्मानित करण्यात येते.
यावर्षी मेढा (जावळी) आगारातील बस चालक आणि श्री गणरायाचे निसिःम भक्त करंजे तर्फे मेढा गावचे सुपुत्र श्री शामराव सखाराम धनावडे (आण्णा) व त्यांच्या सहपत्नी यांना सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन सातारचे अधिकारी पलंगे साहेब यांचे हस्ते सत्कार करणेत आला .
सदर सन्माना बद्दल आण्णांचे जावळी तालुक्यातुन सर्व स्तरातुन खुप खुप अभिनंदन होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button