जावळीजिह्वाराज्यसामाजिक

शिवकृपा पतपेढी परंपरा, सेवा, विश्वास अन् समृद्धीची नातं जपणारी संस्था – २२ नोव्हेबरला संस्थेचा ४० वा वर्धापनदिन

सचिन वारागडे – प्रतिनिधी
कुडाळ दिनांक 21 – शिवकृपा सहकारी पतपेढी लि., मुंबई या संस्थेचा ४० वा वर्धापन दिन २२ नोव्हेबरला साजरा होत आहे. त्यानिमित्त पाचवड ता वाई शाखेत स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. संस्थेच्या विकासात व दैदिप्यमान प्रगतीमध्ये संस्थेचे पदाधिकारी, सभासद, कर्मचारी, दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांचे स्थान अनन्यसाधारण आहे, सर्वांचे सहकार्य आणि स्नेह सोबत आहे, म्हणूनच प्रगतीचे असे पटी पटीने टप्पे पार होत आहेत.संस्था वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या पाचवड शाखा कार्यालयात मंगळवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता स्नेह संवर्धन दिपपूजन कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपल्या संस्थेने ग्राहकांच्या विश्वासास पात्र राहुन महाराष्ट्र राज्यात १०० शाखाचं जाळ असून, त्या माध्यमातून ५००० कोटी संमिश्र व्यवसायाकडे आगेकूच करीत संस्था सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे यशस्वी घौडदोड करीत आहे. संस्थेच्या सर्वांगीण नेत्रदीपक कामगिरीमुळे महाराष्ट्र शासनाने सहकरातील मानाचा सर्वोच्च सहकार भूषण2022 पुरस्कार देवून गौरविले आहे. भविष्यात संस्थेच्या विविध ठेवी, कर्जे या योजनेच्या माध्यमातून आपले जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत, असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. संस्था वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या पाचवड शाखा कार्यालयात मंगळवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता स्नेह संवर्धन दिपपूजन कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

sahyadri-today-logo
sahyadri-today-log
o

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button