
कुडाळ ता. 8 – कुडाळ जिल्हा परिषद गटाचा प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मेळावा कुडाळ येथे संपन्न झाला. यावेळी सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्येकर्ते व इच्छुक उमेदवार यांनी भारतीय जनता पार्टीचे लोकसभा, विधानसभा व स्थानिक निवडणूकांमध्ये महाराज साहेबांचे विचारांशी बांधील राहीलेल्या कार्यकर्त्यांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उमेदवारीची संधी दयावी, असा एकमुखी ठरावा संमत करण्यात आला आणि आगामी काळात या निवडणूकीत कुडाळ गटामध्ये सर्व जागा मा. ना. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व भारतीय जनता पक्षाला निवडून आणण्याचा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला कुडाळ गटाचे नेते मा. सैारभबाबा शिंदे, चेअरमन, प्रतापगड साखर कारखाना, संदिप परामणे, तालुका मंडल अध्यक्ष भाजपा, मच्छिंद्र क्षीरसागर, माजी जि.प. सदस्य, हेमंत शिंदे, उपसभापती, जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती, मच्छिंद्र मुळीक, मनेष फरांदे, संचालक, तसेच अॅड. शिवाजीराव मर्ढेकर, व्हा.चेअरमन प्रतापगड कारखाना, दादा पाटील, प्रादिप तरडे, संचालक, हिंदूराव तरडे, संचालक किसनवार साखर कारखाना, समीर आतार, अध्यक्ष, ओ.बी.सी. सेल भाजपा, एकनाथ रोकडे, आर.पी.आय. तालुका अध्यक्ष, अभिजीत दुदुस्कर, सरचिटणीस भाजपा, श्रीमती गिताताई लोखंडे, महिला आघाडी भाजपा, महेश देशमुख, अजित मर्ढेकर, धनंजय गोरे, इंद्रजीत भिलारे, पाडुरंग वाघ, सरचिटणीस भाजपा, सैा. सुरेखाताई कुंभार, सरपंच, कुडाळ व जि.प. गटातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी कुडाळ जिल्हा परिषद गट, कुडाळ पंचायत समिती गण व सायगाव पंचायत समिती गण यामधील इच्छुक उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी सौरभ शिंदे बोलताना म्हणाले, कुडाळ जिल्हा परिषद गटात मा. ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व भाजपा याच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. प्रामुख्याने पाचवड त आलेवाडीचा प्रमुख मार्ग असेल, रायगाव-खर्शी ते सोनगाव रस्ता काँक्रीटीकरण असेल, तसेच नव्याने मंजूर झालेला आनेवाडी ते वाघेश्वर काँक्रीट रस्ता, मागील काळात मोरावळे ते मेढा झालेला हॅम रोड तसेच प्रत्येक गावात कोटींची विकासकामे मार्गी लागलेली आहेत, ही वस्तूस्थिती आहे. आजिंक्यतारा-प्रतापगड साखर उदयोगाच्या माध्यमातून बाबाराजेंच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, सभासद यांना न्याय देण्याचे काम केले आहे. ही विकासाची वाटचाल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चालू ठेवण्यासाठी आगामी काळात कुडाळ जिल्हा परिषद गटातील तीनही उमेदवार बहुमताने निवडून देवून ना. बाबाराजेंचे हात बळकट करण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सर्व कायकर्त्यांचा आहे

.मच्छिंद्र क्षीरसागर बोलताना म्हणाले गटाची उमेदवारी ही मूळ ओ.बी.सी., जे बारा बलुतेदारांचे प्रतिनिधीत्व करतात त्यांनाच मिळावी. सायगाव गणासह जिल्हा परिषदेची उमेदवारी करण्याची संधी ही मेढा विभागातील ११ गावांना प्रामुख्याने मिळावी. तसेच मा.नामदार बाबाराजे घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही सर्व कार्यकर्ते ताकदीने काम करुन सर्व जागा निवडून आणू, अशी ग्वाही दिली.मच्छिंद्र मुळीक बोलताना म्हणाले,आगामी जिल्हा परिषद निवडणूकीत कुडाळ जिल्हा परिषद गटात सर्वांनी आगामी काळात गट – तट बाजूला सारुन एकमुखाने आदरणीय ना. शिवेंद्रराजे देतील त्या उमेवारांचे काम ताकदीने करु व कुडाळ गटाला लागलेला डाग पुसुन काढायचे काम आपण सर्वजण एकत्र येवून करुया. याप्रसंगी संदीप परामणे, दादा पाटील, गीताताई लोखंडे, हेमंत शिंदे, अँड.शिवाजीराव मर्ढेकर, मनेष फरांदे, सैा.मोनालीताई बारटक्के, सैा.माधुरी गोरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली व सर्व उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला.




