
कुडाळ (प्रतिनिधी) – राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले हे मंत्री झाल्यापासून संपुर्ण तालुक्याचा गतिमान विकास सूरू असून जावली तालुक्यातील सर्वात मोठी लेकसंख्या असलेल्या कुडाळ गावातही कोट्यावधी रूपयांची विकासकामे सूरू झालेली आहेत, कुडाळ गावातील अंतर्गत मुख्य रस्ता संभाजी महाराज चौक – बाजारपेठ – हायस्कूल रस्ता- इंदीरानगर चौक हा रस्ताचे देखील काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून सदरचा रस्ता हा दोन्ही बाजूला बंदिस्त गटार, तसेच संपूर्ण डांबरीकरण म्हणून मंजूर करण्यात आला होता, मात्र प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ बाबा शिंदे तसेच कुडाळ ग्रामपंचायत सरपंच सुरेखा कुंभार व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रत्यक्षात जाऊन नामदार शिवेंद्रराजे यांची भेट घेऊन सदरचा रस्ता हा गावातील मुख्य रस्ता असून या रस्त्यावर सातत्याने वाहतूक असते त्यामुळे सदरचा रस्ता दीर्घकाळासाठी टिकाऊ व मजबूत होण्याच्या दृष्टीने तो डांबरीकरण ऐवजी कॉंक्रिटीकरणाचा व्हावा अशी मागणी समस्त ग्रामस्थांच्या वतीने केली, कुडाळ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा व ग्रामस्थांच्या मागणीचा तात्काळ विचार करून नामदार शिवेंद्रसिंह भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री अहिरे यांना तात्काळ फोन करून सदरच्या रस्त्यासाठी वाढीव निधीची गरज लागली तरी देण्याचे सूचना करून सदरचा रस्ता हा काँक्रिटीकरण करण्यात यावा असे आदेश दिले त्यामुळे कुडाळ बाजारपेठ येथील अंतर्गत रस्ता आता कॉंक्रिटीकरणाचा होणार असल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने सौरभ बाबा शिंदे यांनी नामदार शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार मानले,

कुडाळ बाजार पेठ ही तालुक्यातील मोठी बाजारपेठ असल्याने सदरचा रस्ता काँक्रिटीकरण झाल्यास कुडाळ बाजारपेठेच्या वैभवात भर पडणार आहे. यावेळी प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सैारभबाबा शिंदे यांच्या सह कुडाळ च्या सरपंच सौ सुरेखा कुंभार ग्रामपंचायत सदस्य धैर्यशील शिंदे, दिलीप वारागडे, गौरव शिंदे, महादेव शिंदे, काशिनाथ शेवते, विजय शिवते, धनंजय पोरे, निलेश पवार, सचिन मदने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.




