जावळीजिह्वाशैक्षणिक

कुडाळ शाळेचे उपक्रम आणि शैक्षणिक दर्जा इतरांसाठी दीपस्तंभ – सौरभ शिंदे : विद्यार्थी, शिक्षकांचा गुणगैारव व बक्षिस वितरण सोहळा संपन्न

कुडाळ ता.8 – जावली तालुक्यातील कुडाळची प्राथमिक शाळा ही सर्वाधिक पटसंख्या असणारी केंद्रशाळा आहे. त्यामुळे या शाळेतील उपक्रम आणि शैक्षणिक दर्जा हा तालुक्यातील अन्य शाळांसाठी दीपस्तंभ आहे. या शाळेतील 24 विद्यार्थांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शाळेचा व गावाचा लौकिक वाढवला आहे. त्यामुळे या शाळेचे शिक्षक व विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, शाळेच्या भैातिक सुविधांसाठी लवकरच आऱाखडा तयार करून शाळेला आदर्श शाळा बनवण्यासठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे मत प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी केले.


कुडाळ ता.जावळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी वशिक्षक यांचा गुणगैारव व बक्षिस वितरण सोहळा आयोजित कऱण्यात आला होता त्यावेळी तेबोलत होते, यावेळी कार्यक्रमास सरपंच सैा. सुरेखा कुंभार, उपसरपंच सोमनाथ कदम, विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष मालोजीराव शिंदे, माजी सरपंच वीरेंद्र शिंदे, सदस्य धैर्यशील शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. चंद्रकांत कर्णे, केंद्रप्रमुख अरविंद दळवी, मुख्याध्यापक सैा. जयश्री गायकवाड यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, पालक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी सैारभ शिंदे यांच्या वतीने शाळेतील 4 विद्याथ्यार्ना स्मार्ट वाँच व 24 विद्यार्त्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.मुख्याध्यापक सैा. गायकवाड बोलताना म्हणाल्या, प्राथमिक शाळांचा चेहरामोहरा बदलण्याच्या उद्देशाने शाळा विकसित होईल. गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या दृष्टीने वर्गखोल्या , संगणकीकरण, शाळा दुरुस्ती, शैक्षणिक साहित्य आदी सुविधांसाठी या शासनाच्या निधीचा विनियोग करणार आहोत. शाळेत विविध स्तरावर होणाऱ्या बदलाचा फायदा विद्यार्थ्यांच्या सर्वंकष विकासासाठी होणार आहे. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांनाही सन्मानित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button