जावळी

देशाच्या लढाईत सुध्दा महिलांचे योगदान – नामदार शिवेंद्रराजे भोसले; अध्यक्ष संदिप परामणे, उदयोजक दत्ता शेठ भालेघरे यांच्या नेतृत्वाखाली रामवाडी येथे “राजमाता अहिल्याबाई होळकर” महिला सन्मान सोहळा संपन्न-

कुडाळ ता. 26 – राजमाता अहिल्याबाई होळकर या इतिहासातील मोठ्या राज्यकर्त्या होत्या, मुघलांशी संघर्ष करून त्यांनी छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असणारे कार्य केले, अनेक ठिकाणची देवस्थाने उभारण्याचेही काम केले, त्यांनी स्वतःची प्रतिमा स्वताच्या कतृत्वावर उभी करून स्त्रीयांना नवा आदर्श घालून दिला, इतिहासात अहिल्याबाईंचे स्थान अढळ आहे, इतिहासाप्रमाणेच अधुनिक युगातील महिलांनीही प्रत्येक क्षेत्रात पुढे जावे, नुकतेच यशस्वी झालेले ऑपरेशन सिन्दुर झाले याची सर्व प्रथम माहिती देण्यासाठी महिलाच पुढे होत्या, देशाच्या लढाईत सुध्दा महिलांचे योगदान आहे, स्त्री म्हणून आपण स्वतःला सक्षम करणे काळाची गरज आहे असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित महिलांशी बोलताना व्यक्त केले.

रामवाडी ता. जावली येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त महिला सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते, पुढे ते म्हणाले, रामवाडी गावासह जावली तालुक्याच्या विकासकामात कधीच कमी पडणार नाही, निधी मर्यादित असतो त्यामुळे ग्रामस्थानी काम सुचवताना गावातील मूलभूत व आवश्यक कामांना प्राधान्य क्रम देणे गरजेचे आहे,असेही ते म्हणाले,कार्यक्रमाच्या सुरुवातिला परिसरातील पाच सरपंचांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्रांचा अभिषेक करण्यात आला. व राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, भाजपाचे जावली तालुका अध्यक्ष संदीप परमने यांनी ‘अहिल्याबाई होळकर आदर्श महिला पुरस्कार’ बाबत महिती सांगून भाजपा च्या वतीने राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली, ‘अहिल्याबाई होळकर आदर्श महिला पुरस्कारांचे ’ नामदार भोसले यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

तसेच गुणवंत विद्यार्थयांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी उदयोजक दत्ताशेठ भालेघरे यांच्या वतीने उपस्थित सर्व महिलांसाठी साडी वाटपही करण्यात आले, कार्यक्रमास जिल्हा फरिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रतापगड काराखान्याचे अध्यक्ष सौरभ बाबा शिंदे, तालुकाध्यक्ष संदीप परामणे, बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, उदयोजक दत्ताशेठ भालेघरे, मीनाक्षी बेलोशे, भाई गावडे, रामवाडीचे माजी सरपंच
सतीश गलगले, गणेश पाडळे, रामदास गलगले, सदाशिव गोळे, शामराव धनवडे, रामवाडी महिला अध्यक्षा संगीता
पाडळे आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि महिला वर्ग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button