कुडाळ ता. 5 जावळी तालुक्यातील येथील म्हसवे विकास सेवा सोसायटीने सभासदांची यावर्षीची दिवाळी गोड केली असून सन २०२२-२०२३आर्थिक वर्षासाठीचा १३ टक्के इतका उच्चांकी लाभांश जाहीर केला आहे.नुकतेच प्रतापगड अजिंक्यतारा कारखाना कार्यस्थळावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सभासदांच्या खात्यावर लाभांशाचा धनादेश जमा करण्यासाठी जिल्हा बँकेचे कुडाळ शाखेचे शाखाप्रमुख रमेश शिंदे ,विकास अधिकारी दीपक पार्टे त्यांचेकडे सुपुर्द करण्यात आला.कुडाळ
याप्रसंगी परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ बाबा शिंदे,माजी सभापती अरुणा शिर्के,अजय शिर्के, सोसायटीचे चेअरमन विठ्ठल शिर्के,व्हाईस चेअरमन बाळासाहेब सावंत, संचालक मानसिंग गोडसे, मारुती शिर्के, हणमंत चव्हाण ,ज्ञानेश्वर शिर्के, दत्तात्रय शिर्के, रणजित शिर्के,जयश्री शिर्के, उषा शिर्के, नारायण कांबळे, ज्ञानेश्वर पवार, ज्ञानेश्वर शिर्के, माजी चेअरमन संभाजी चव्हाण ,विठ्ठल शिर्के,अंकुश शिर्के, जयवंत चव्हाण ,आनंदराव गायकवाड, तुळशीदास शिर्के,सचिव विठ्ठल शिर्के आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
सभासदांना केंद्रबिंदू मानून आणि सभासदांचे हित जोपासत संस्थेची प्रगती उंचावली आहे.संस्थेने यावर्षी उच्चांकी लाभांश वाटप करून सभासदांचा विश्वास संपादन केला आहे.एकूण ५३१ सभासद असणाऱ्या म्हसवे विकास सोसायटीचे ३९,५७६८० इतके भागभांडवल आहे.२,३२,१६,३२३ एवढे कर्जवाटप केले असून संस्थेची बँक पातळीवर कायम शंभर टक्के वसुली होते.सन २०२२-२०२३ आर्थिक वर्षात संस्थेला ११,६८,४४६ इतका नफा झाला असून सर्व तरतुदी करून सभासदांना १३ टक्के इतका लाभांशाचे वाटप करण्यात आले आहे. उच्चांकी लाभांश वाटपामुळे सभासदांनी चेअरमन,व्हा.चेअरमन, सर्व संचालक,सचिव यांचे कौतुक केले.