
कुडाळ ता. 26 – स्वर्गीय माजी आमदार लालसिंगराव काका हे दूरदृष्टीचे नेते होते म्हणूनच त्यांनी प्रतापगडची साखर कारखान्याची उभारणी केली दुर्दैवाने प्रतापगड संकटात सापडला होता मात्र आता अजिंक्यताराच्या मदतीने प्रतापगडने यावर्षी दोन लाख साखरेच्या पोत्यांचा टप्पा पार केला असून शेतकऱ्यांनी असच सहकार्य प्रतापगड कारखान्याला करावे, यंदाच्या हंगामात किमान साडे तीन लाखाचे गाळप करण्याचे आमचे उद्दीष्ठ असून कोणतंही राजकारण न करताप्रतापगडची
घौडदौड सुरू आहे, जिल्हयातील सर्वोत्तम दर देणारा कारखाना म्हणून प्रतापगड अजिंक्यतारा उद्योग समूहाचा भविष्यात नावलैाकिक होईल असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केला.

माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त कारखाना स्थळावर दोन लाख साखर पोत्यांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले, त्यावेळी श्री भोसले बोलत होते यावेळी प्रतापगडचे अध्यक्ष सौरभ शिंदे, उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, अजिंक्यताऱ्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावंत, माजी सभापती मोहनराव शिंदे, उपसभापती हणमंतराव पार्टे, तानाजी शिर्के, बुवासाहेब पिसाळ, यांच्यासह कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते,राजेंद्र भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, प्रतापगड ने दोन लाख पोत्यांचा टप्पा पूर्ण केला असला तरी अजून मोठे ध्येय आपल्याला गाठायचे आहे यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत, कारखान्याची आर्थिक स्थिती सक्षम होण्यासाठी अजून तीन गळीत हंगाम आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे, प्रतापगडची शून्यातून उभारणी सुरू आहे आम्ही शब्द दिल्याप्रमाणे इतर कारखान्यांच्या तुलनेने दरही चांगला दिला आहे. आजपर्यंत ज्यांनी कारखाना चालवायला घेतला त्यांनी केवळ स्वताचा अतिरिक्त उस गाळपासाठी कारखान्याचा उपयोग करून घेतला मात्र अजिंक्यतारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून भविष्यात प्रतापगड स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाज करत आहे, भविष्यात कारखाना स्वबळावर चालेल असा विश्वास व्यक्त करून प्रतापगडच्या उत्पादित साखरेचा दर्जा हा उच्च प्रतिचा असून यामध्ये उस उत्पादक शेतकरी , कामगार, अधिकारी यांचा मोलाचा वाटा आहे,

प्रतापगडचे अध्यक्ष सौरभ शिंदेम्हणाले, गेली अनेक वर्ष प्रतापगड बंद अवस्थेत होता मात्र अजिंक्यतारा कारखाना आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या मदतीने यावर्षी प्रतापगड दिमाखदारपणे गाळप करत आहे, स्वर्गीय लालसिंगकाकांचे व भैय्यासाहेबांचे स्वप्ऩ आज खऱ्या अर्थाने सत्यात उतरले आहे, आपल्याला साडे तीन ला ख टनाचा टप्पा गाठायचा असून शेतकऱी, सभासदांनी कारखान्यावर विश्वास ठेवून जास्तीत जास्त उस प्रतापगडला द्यावा, इतर कारखान्यांच्या तुलनेत प्रतापगडने दरही चांगला दिला आहे, शेतकऱ्यांच्या खात्यावर सर्व पैसे जमा सुदधा झाले आहेत, आपल्या तालुक्याचा स्वाभिमान असलेला प्रतापगड कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी शेतकऱ्यांनी असेच सहकार्य करावे असे आवाहनही सौरभ शिंदे यांनी केले
कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वर्गीय लालसिंगराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व साखरेच्या पोत्यांचे विधिवत पूजन करण्यात प्रस्ताविकात उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर यांनी स्वर्गीय लालसिंगराव काका व राजू भैय्यायांचे स्मारक कारखाना स्थळावर व्हावे अशी मागणी केली. तर आभार अजिंक्यतारयाचे उपाध्यक्ष नामदेव सावंत यांनी मानले यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अरुण देशमुख यांचे ऊस व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन झाले
चैाकट – दिपक पवारांना जावलीच्या सहकारावर बोलण्याचा अधिकार नाही
प्रतापगड कारखाना भविष्यात स्वबळावर चालेल यासाठी आम्ही प्रयत्ऩशिल असून कारखानाचालवताना आम्ही कसलेही राजकारण केले नाही, राजकीय मतभेद काहीही असू तालुक्याचा सहकार टिकला पाहीजेत ही आमची भूमीका आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रतापगडला ऊस घालून सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो तर दीपक पवार यांनी मात्र काही शेतकऱ्यांचा ऊस इतर कारखान्यांना पाठवला असून त्यांना जावलीच्या सहकारावर बोलण्याचा अधिकार राहीला नाही, कारखान्यावर निवडणुक लादणाऱ्यांच्या धोरणी भूमिकेबाबत जनतेने आता निर्णय घ्यावा, अशी खरमरीत टिकाही त्यांनी केली.

