‘नामदार बाबाराजे भविष्यात मुख्यमंत्री होतील’ – समाधान पोफळे – म्हसवे गटातील सर्व जागांवर भाजपचेच उमेदवार विजयी करण्याचा निर्धार – वाढदिवसानिमित्त मेळावा संपन्न

कुडाळ ता. 12 – महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली समाजासाठी सातत्याने, निस्वार्थपणे काम करणारे सरपंच परिषदेचे अध्यक्ष समाधान पोफळे यांचे राजकीय कार्य आज लोकांच्या विश्वासाने अधिक उजळून निघाले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी जमलेली अलोट गर्दी ही त्यांच्या कार्याचीच पावती असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांनी केले.
सोमर्डी (ता. जावली) येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी जिल्हा बँकेचे संचालकज्ञानदेव रांजणे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, पंचायत समितीच्या माजी सभापतीअरुणा शिर्के, उपसभापती रवींद्र परामणे, मंडलाध्यक्ष संदीप परामणे, मच्छिंद्र मुळीक, अजय शिर्के, रेश्मा पोफळे,प्रवकते सुरेश गायकवाड, समीर आतार, विकास धोंडे, रणजित शिंदे, राजेंद्र महाडिक, किरण भिलारे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

मानकुमरे पुढे म्हणाले की, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तयारी झाली असून जावली तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट व सहा पंचायत समित्यांमध्ये भाजपचे उमेदवार बहुमताने निवडूनयेतील. वास्तविक समाधान पोफळे हे उत्तम व्यवसायिक असून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा करहर येथे बांधकाम साहित्य विक्रिचा व्यवसाय आहे, व्यवसायात चांगला जम बसवत ते अल्पावधीतच एक उद्योजक म्हणून नावारूपाला आलेले आहेत, व्यवसाय करताना गावाची व समाजाची बांधिलकी जोपासण्याचे व्रतही त्यांनी हाथी घेतले असून समाजकारणाला राजकारणाची जोड देताना त्यांनी वालुथ गावचे सरपंच पद भुषविले आहे, केवळ सरपंच पदावरच त्यांनी न थांबता जावली तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्षपदीही त्यांनी काम केले, तालुक्यातील अनेक सरपंचांचे नेतृत्व करत त्यांनी स्वताचे नेतृत्व सिध्द केले आहे, अशा राजकारणी व व्यवसयिक व्यक्तीमत्वाचा काल एक नवे रूप सर्वानाच अनुभवयास मिळाले,

भाजपा अध्यक्ष संदिप परामणे म्हणाले, समाधान सारखा युवा वारकरी सामाजिक कार्यातही सक्रिय असतात. ते गरजू लोकांना मदत करतात, पर्यावरण संवर्धनासाठी काम करतात आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील असतात, समाधान म्हणजे मित्र परिवार संघटनेच्या माध्यमातून सतत लोकांच्या हाकेला धावून जाणारे युवा नेतृत्व आहे, अगदी कमी वयात समाधान यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे. समाधान यांनी सर्वजाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन त्याच बरोबर एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील राजकीय नेत्याची आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अगदी कमी वयात यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे.

‘ना. बाबाराजे मुख्यमंत्री होतील’ – समाधान पोफळे
यावेळी समाधान पोफळे यांनी ठाम विश्वास व्यक्त करत सांगितले की, ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची स्वच्छ प्रतिमा, कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्व आणि पक्षीय पातळीवरील विश्वासार्हता पाहता ते भविष्यात महाराष्ट्राचेमुख्यमंत्री होतील.”माझ्या वाढदिवसाचा गाजावाजा करण्याची हौस नाही; मात्र निवडणूक काळातच वाढदिवस आल्याने कार्यकर्त्यांनी या निमित्ताने मेळाव्याचे स्वरूप दिले,” असे सांगत त्यांनी गेल्या पंधरा वर्षांतील सामाजिक कार्याचा लेखाजोखा मांडला. सरपंच पदाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास, तालुकास्तरावर सरपंचांचे संघटन, त्यांच्या अडीअडचणी शासनदरबाटी प्रभावीपणे मांडून सरपंच परिषदेला राज्यस्तरीय ओळख मिळवून देणे- या कामांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. आगामी काळातही ना. बाबाराजेंच्या नेतृत्वाखाली आणि ज्येष्ठ नेत्यांच्यामार्गदर्शनाखाली समाजासाठी योगदान देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.कार्यकर्तृत्वाला मान्यवरांची दादप्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी पोफळे यांच्या कामकाजाचे कौतुक करत,”सामाजिक बांधिलकीच राजकीय यशाचा पाया ठरते,” असे नमूद केले. यावेळी विविध मान्यवरांनी समाधान पोफळेयांच्या कार्याचा गौरव केला. भाजपचे नवोदित तालुका प्रवक्ते सुरेश गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.एकूणच, नेतृत्वाचा विश्वास, कार्यकर्तृत्वाची ताकद आणि जनतेची साथ – या त्रिसूत्रीमुळे
समाधान पोफळे यांची राजकीय वाटचाल अधिक धारदार होत असल्याचे व त्यांच्या सुविद्य पत्नी रेश्मा पोफळे यांना म्हसवे गणातून उमेदवारी मिळम्याची दाट शक्यता असल्याचे चित्र वाढदिवसाच्या सोहळ्यातून ठळकपणे समोर आले.




