जावळीजिह्वासामाजिक

लोकशाहीरांचे विचार अंगीकृत करा : किरण बगाडे – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त करहर येथे रँली

कुडाळ ता. 2 – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) च्या वतीने करहर ता.जावली येथ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांसह मोठ्या उत्साहात साजरीकरण्यात आली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त जावळी तालुक्यातील करहर, मेढा व कुडाळ आदी परिसरात विविध उपक्रम व रँलीचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाच्या सूरूवातीस लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस सर्व पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक, राजकीय संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी अभिवादन केले

यावेळी कार्यक्रमात बोलताना संघटनेचे जिल्हा सचिव किरण बगाडे म्हणाले, जग बदल घालुनी घाव सांगून मज गेले भीमराव हा संदेश बहुजनांना देत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी अनेक साहित्य कादंबरी लिहिल्या, त्यातून समाज प्रबोधन करून समाजाला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. पीडित कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी लढा उभारला, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान च्य माध्यमातून भारतीय प्रत्येक नागरिकाला हक्क आणि अधिकार दिले आहेत त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येकाने स्वतःच्या हक्कासाठी लढले पाहिजे तसेच एकजुटीने राहणे गरजेचे आहे, आज पर्यंत जावली तालुक्यामध्ये सार्वजनिक पद्धतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी झाली नव्हती मात्र सर्व बांधवांच्या वतीने यावेळी आयोजित करण्यात आले असून इथून पुढच्या कालावधीमध्ये सर्व बांधवांच्या विचारातून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची भव्य अशा पद्धतीची जयंती साजरी करणार असा निर्धार सर्व बांधवांनी केला आहे. या कार्यक्रमावेळी जावली तालुकाध्यक्ष अमित साळुंखे, उपाध्यक्ष सयाजी भिसे, सचिव दिगंबर कांबळे, टायगर ग्रुप चे अजय चव्हाण, अतुल भिसे, सुनील भिसे, बळवंत कांबळे, राम गायकवाड, धर्मा भिसे, श्री.पुजारी, शामराव भिसे, राजू भिसे, अक्षय दुधाने, सदाशिव भिसे, अशोक भिसे, राजू खुडे, संगीता भिसे व इतर महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button