जावळीराजकीय

नामदार शिवेंद्रसिंहराजेंच्या हस्ते सोमर्डीला शनिवारी सार्वजनिक वाचनालय इमारतीचा भूमिपूजन सोहळा ; वसंतराव मानकुमरेंचा वाढदिवसानिमित्त आयोजन – कार्यक्रमाला लाडक्या बहिणींनी उपस्थित राहण्याचे अध्यक्ष संदिप परामणे यांचे आवाहन

कुडाळ ता. 7 – जावळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना वाचनाचे खुले दालन करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक वाचनालय आता नव्या वास्तूत उभारले जाणार आहे. नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या दूरदृष्टीतून ही नूतन इमारत उभी राहणार आहे. या इमारतीचा भूमिपूजन सोहळा सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते व जावळी तालुक्याचे नेते वसंतराव मानकुमरे यांच्या उपस्थितीत शनिवारी पाच वाजता पार पडणार आहे. अशी माहिती वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष संदीप परामणे यांनी दिली.

अतिशय खडतर परिश्रमातून तालुक्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत पुढे आला पाहिजे. त्याला योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने संस्थापक अध्यक्ष संदीप परामणे यांनी अगदी ७० पुस्तकांपासून या वाचनालयाची सुरुवात केली. आज हजार पुस्तकांपर्यंत हे वाचनालय गेले आहे. वाचनालयातून अनेक विद्यार्थी, युवकांनी तलाठी, पोलीस भरती ,त्याचबरोबर गटविकास अधिकारी अशा वरिष्ठ अधिकार पातळीवरील परीक्षात यश मिळवले असून आज हे युवक शासकीय सेवेत जाऊन समाजाची सेवा करीत आहेत.या वाचनालयास इमारत नसल्याने नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तब्बल २५ लाखांचा निधी मंजूर केला असून, उपलब्ध निधीतून सुबक व आकर्षक अशी सुसज्ज इमारत उभारली जाणार आहे. अशा या इमारतीचा भूमिपूजन सोहळा,तसेच सोमर्डी – शेते विकास सोसायटी इमारतीचे उदघाटन,म्हसवे गटातील कार्यकर्ते व लाडक्या बहिणी यांचा संवाद सोहळा शनिवारी पाच वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास तालुक्यातील भाजप नेते, पदाधिकारी, मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमास तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संदीप परामणे यांनी केले आहे.

मानकुमरे भाऊंचा ६१ वा वाढदिवस होणार साजरा

जावळी तालुक्याचे नेते वसंतराव मानकुमरे यांचा याच दिवशी ६१ वा वाढदिवस देखील असून मोठ्या दिमाखात साजरा करणार आहेत.नामदार शिवेंद्रसिहराजे भोसले यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button