
कुडाळ ता.23 : सायगाव पंचायत समिती गणात भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवार म्हणून पुढेआलेल्या चारूशिला विवेक पवार यांची आनेवाडी (ता.जावली) गावाने सर्वानुमते अधिकृत उमेदवार म्हणून निवड करत एकजूट आणि विकासाचा ठोस संदेश दिला आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवत ग्रामस्थांनी “गाव प्रथम” ही भूमिका घेत विजयाचा निर्धार केला आहे.
सायगाव पंचायत समिती गणातून उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी चारूशिला विवेक पवार यांना भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आल्यानतर गावातील महिला, तरुण, प्रौढ, शेतकरी, अशा सर्व स्तरांतील नागरिकांनी एकमुखाने या उमेदवारीचे स्वागत केले असून शंभर टक्के मतदानाचा व विजयाचा निर्धार केला आहे. काल गणेश जयंतीच्या निमित्ताने चारूशिला पवार यांनी त्यांच्या समर्थकासंह आनेवाडी, रायगाव, महमुलकरवाडी, सायगाव, गावातील मतदांना व महिलांना प्रत्यक्ष भेटून प्रत्येक घरातून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले असून, सायगाव गणात विक्रमी मतदान घडवून आणण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.यावेळी आनेवाडी येथील संत सावतामाळी मंदिरात सर्वांच्या उपस्थितित आरती करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

चारूशिला विवेक पवार व त्यांचे पती विवेक पवार हे सामाजिक कार्यातून पुढे आलेल्या आणि गावपातळीवरील प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. गावातील मुलभत प्रश्न, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम, शेतकऱ्यांसाठी सुविधा, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी या मुद्द्यांवर काम करण्याची त्यांची स्पष्ट भूमिका ग्रामस्थांना भावली. त्यामुळेच गावाने कार्यनिष्ठेला प्राधान्य देत त्यांच्यावर एकमताने विश्वास टाकला आहे. यावेळी त्यांच्या गावभेट दैार्याप्रसंगी निता जाधव, अलका फरांदे,सुनिता जगताप, साधना देशमाने ,वैशाली फरांदे, आदी महिलांसह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते. सैा. चारूशिला पवार यांच्या उमेदवारीमुळे सायगाव गणात राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.




