जावळीजिह्वासामाजिक

नववर्षाच्या स्वागतासाठी पहाटे ५ वाजेपर्यंतचा जल्लोष – ग्रामिण भागातील हॉटेल, रेस्टाँरंट व्यावसायिकांची जय्यत तयारी – खव्वैयांसाठी मेजवाणी

कुडाळ (प्रतिनिधी) दिनांक -30 – सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस ३१ डिसेंबर आणि नववर्ष स्वागताच्या अनुषंगाने शहरांप्रमाणेच ग्रामिण भागातील हॉटेल व्यावसायिंकांनी सुध्दा जय्यत तयारी सुरु केली आहे. यावर्षी शासनाच्या पत्रानुसार यावर्षीचा नववर्षाचा जल्लोष पहाटे ५ वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिंकांमध्येही उत्साह असल्याचे चित्र आहे.कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीत कोरोनामुळे नववर्षाच्या स्वागताचे तीन तेरा वाजले होते. यावर्षी मात्र तशी परिस्थीती नसल्यामुळे व शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे यंदाचा नववर्षाचा जल्लोष उत्साहात होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

विविध हॉटेलमध्ये विविध प्रकारच्या ऑफर्स सुरु आहेत व ३१ तारखेसाठीचे आगाऊ बुकींगही सुरु झाले आहे. त्यामुळे यंदाचा सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करतानाचा उत्साह अधिक पाहायला मिळणार आहे. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे या नववर्षाच्या स्वागताच्या जल्लोषासाठी पहाटे ५ वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक समाधानी आहे. पहाटे ५ पर्यंत हॉटेल व रेस्टॅरन्ट सुरु राहतील,

जेवण म्हणजे जेवण असतं, आमचं आणि इतरांच सेम नसतं. एकदा खाल तर परत परत याल. या पंक्तीप्रमाणे जावळी तालुक्यातील कुडाळ व परिसरात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला उत्तम, व आरामदायक सेवा पुरविणाऱी हॉटेल्स अग्रक्रमावर आहेत. येथील हाँटेल व्यवसायिकांनी आपल्या चवीच्या जोरावर लोकप्रियता मिळविली आहे. जेवणापेक्षा महत्त्वाचं असते जेवतानाच वातावरण. हे वातावरण स्वच्छ, स्वस्त आणि मस्त असेल, तर येणारा ग्राहक हा परिवारातील कायमस्वरूपी सदस्य होऊन जातो. हे तत्त्व येथील हाँटेल व्यवसायिकांनी जपले आहे. त्यामुळे कुडाळ व परिसरातील हॉटेलची ख्याती दिवसेंदिवस वाढत आहे. जावळी तालुक्यातील चोखंदळ खवय्यांची पसंती विचारात घेऊन आपलेही उत्तम हॉटेल असावे, या ध्यासातून अनेक हॉटेलची उभारणी या परिसरात झाली आहे, येथील हॉटेलची रचना म्हणजे ग्राहकांना सुखद वाटेल अशी सजावट आणि मन प्रसन्न करणारे वातावरण. वेगाने वाढणाऱ्या हॉटेल संस्कृतीतही आपले खास वेगळेपण जपण्याचा हॉटेल व्यवसायिकांचा नेहमीच प्रयत्न असतो, नॉनव्हेजमध्ये मटण मालवणी, चिकन मालवणी, चिकन मटण रामपुरी,” चिकन मटण हैदराबादी, कबाबचे असंख्य प्रकार, चिकन मटण थाळी, मुर्ग मुसल्लम. व्हेज फूडमध्ये व्हेज उजाला, पनीर-काजू काजू मसाला, व्हेज फ्राय व इतर अनेक व्हेजचे पदार्थ. जे खाऊन लोक तृप्त होतात, संगीतमय वातावरण, उत्कृष्ट सेवा, फूड क्वॉलिटी यामुळे कुडाळ य़ेथील हाँटेल खव्वयैंच्या पसंतीस उतरले आहेत, उत्तम सेवा, फूड क्वॉलिटी, पुरेशी क्वॉंटिटी, स्टार्टर्स यांची मजा घेऊन आपल्या नव्या वर्षाचे उत्साहात स्वागत, येथील हाँटेलमध्येच करावे, असे आवाहन कुडाळ व परिसरातील हाँटेल व्यवसायिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button