

कुडाळ दि. 10 – जावली – महाबळेश्वर तालुका केमिस्ट असोशियनच्या अध्यक्षपदी कु़डाळ येथील सचिन हिंदुराव तरडे यांची निव़ड झाली. जावली – महाबळेश्वर तालुका केमिस्ट असोशियनच्या पदाधिकारी निवडीसाठी नुकतीच निवडणुक झाली होती, त्यावेळी अध्यक्षपदासाठी मेढा येथील प्रविण गाडवे व कुडाळ येथील सचिन तरडे यांच्यात लढत झाली त्यामध्ये 36 विरुद्ध 18 मतांनी सचिन तरडे यांचा दणदणीत विजय झाला.
जावली व महाबळेश्वर तालुका केमिस्ट असोसिएशनच्या कार्यकारिणीची त्रैवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली, सन २०२२ ते २०२५ वर्षाकरिता ही निवडणुक घेण्यात आली. सदर निवडणुकीकरिता निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून श्रीकांत जवळ यांनी काम पाहिले. सदरची निवडणूक ही 6 जागांकरिता होती. त्यापैकी 5 जागा आधीच बिनविरोध निवडून आल्या होत्या, केवळ एका जागेसाठी ही निवडणुक झाली. सदरची निवडणुकीसाठी मेढा येथील प्राथमिक शाळेत मतदान घेण्यात आले तर सातारा येथील केमिस्ट भवन येथे मतमोजणी करण्यात आली. त्यामध्ये सचिन तरडे यांचा 18 मतांनी सचिन तरडे दणदणीत विजय झाला.

यावेळी MSCDA चे संघटक सचिव मदन भाऊ पाटील, MSPC चे अध्यक्ष विजय पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष सागर पाटील, MSCDA संचालक अरुण पवार यांनी अभिनंदन केले. या अगोदर जावली केमिस्ट असोशियनच्या उपाध्यक्षपदी किरण धनावडे, सचिवपदी राजेंद्र जाधव, खजिनदारपदी सुभाष पाडळे, व कार्यकारिणी सदस्यपदी संतोष ढेबे, मयूर शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी अभय टंकसाळे, जयकुमार आंदळकर, प्रशांत महाजन आदी सभासद उपस्थित होते.
यावेळी निवडणूक यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल निवडणुक निर्णय अधिकारी श्रीकांत जवळ यांचा सत्कार करण्यात आला. नूतन अध्यक्ष सचिन तरडे म्हणाले की, जावली व महाबळेश्वर तालुका केमिस्ट असोसिएशनच्या सभासदांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला तडा न जाता सभासदांचे विविध प्रश्न मार्गी लावू सर्वांना बरोबर घेऊन चांगले काम उभे करू. संघटनेचा नावलौकिक वाढवून सर्वांना विश्वासात घेऊन असोसिएन चे कामकाज केले जाईल असेही ते म्हणाले. यावेळी नूतन सचिव राजेंद्र जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.


