
प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मा.श्री. सौरभबाबा शिंदे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा निमित्त कुडाळ ता.जावली येथे उद्या शनिवार दि. 15/11/2025 रोजी सायं. 5 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती ग्राउंड येथे महाराष्ट्रातील प्रसिध्द सचिन भाउजी यांचा होम मिनीस्टर खेळ पैठणीचा हा खास महिलांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम आजोयजित करण्यात आला आहे, या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून नामदार श्रीमंत छत्रपती. शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराजसाहेब (सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर जिल्हा ) हे उपस्थित राहणार आहेत तसेच तालुक्यातील लउतरही प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत,

या कार्यक्रमासाठी खास आकर्षण झी मराठी “देव माणूस फेम ” सिने अभिनेत्री सोनम म्हसवेकर याही उपस्थित राहणार आहेत, तसेच सचिन, भाऊजी यांचा खेळ पैठणीचा सन्मान वहिनीचा या कार्यकमात सहभागी होणाऱ्या महिलांसाठी हजारोंची पक्षिसे ठेवण्यात आली असून विजेत्यास प्रथम बक्षीस फ्रीज, द्वितीय बक्षीस LED टी. व्ही., तृतीय बक्षीस कुलर, चतुर्थ बक्षीस मिक्सर, पाचवे बक्षीस इस्त्री तसेच लकी डाँ कुपन पध्दतीतून तब्ब्ल 50 महिलांना आकर्षक पैठणी साडी तसेच येणाऱ्या सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तूही देण्यात येणार आहे.या कार्यक्रमासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा श्री.छ. वेदांतिकाराजे भोसले, प्रचापगड कारखान्याच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुनेत्रा शिंदे, कै.लालसिंगराव शिंदे पतसंस्थेच्या अध्यक्षा सैा.अंकितावहीनी शिंदे आदी महिला मान्यवरही उपस्थित राहणार असून कुडाळ जिल्हा परिषद गटातील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सैारबबाबा शिंदे यांच्या वतीने सैा. मोनालीताई बारटक्के यांनी केले आहे.




