जावळीराजकीय

सायगाव गणातून सौ.अस्मिता विवेक पवार यांना उमेदवारी देण्याची ना.शिवेंद्रराजे यांच्याकडे मागणी – ग्रामस्तांनी घेतली भेट

सातारा – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सायगाव पंचायत समिती गणातून भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते विकास सेवा सोसायटीचे चेअरमन विवेक पवार यांच्या पत्नी सौ.अस्मिता विवेक पवार यांना उमेदवारी देण्यात यावी,अशी जोरदार मागणी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे आनेवाडी व पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांच्या वतीने आज करण्यात आली.
यावेळी मंत्री-महोदय शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना उपस्थित ग्रामस्थांनी मकरसंक्रांतीच्या शुभेच्छाही दिल्या. यावेळी
आजपर्यंत भाजपा पक्षाच्या अनेक निवडणुकींसाठी व प्रचारासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन त्यांची निष्ठा आणि कामाची दखल घेण्याची अपेक्षा यावेळी व्यकत करण्यात आली, सौ.अस्मिता विवेक पवार यांचे महिला संघटन, तसेच सामाजिक कार्यात असलेले योगदानाचा विचार या निवडणुकीच्या निमितत्ताने व्हावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली, यावेळी आदरणीय मंत्री-महोदय यांनी मतदारसंघात संपर्क वाढवून सन्माननिय मतदार बंधू आणि भगिनींना भेटावे अशी बहुमुल्य सुचना मंत्री-महोदय यांनी दिली व शुभेच्छा दिल्या.त्याप्रसंगी सन्माननिय दादा पाटील, सौ.वैशालीताई फरांदे, – श्री.विवेक दिनकर पवार, डाँ.प्रमोद फरांदे, उपसरपंच अमितदादा -चेअरमन विजयबापू-हरिभाऊ फरांदे-मनोहर वकील-प्रसाद देशपांडे संतोष पिसाळ-अतुल गोरे-ओंकार भोसले अदि मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button