
अभिजित शिंदे, इंदवली
कुडाळ ता. 7 – सध्याची तरूणाई अधुनिक वीचारसरणीत गुरफटली असताना, जावली तालुक्यातील वालुथ येथील
समाधान पोफळे नावाचे युवा नेतृत्व वारकरी संप्रदायाची परंपरा, विचार आणि जीवनशैली युवा पिढीमध्ये रुजवण्याचे काम मोठ्या हिमतीने व हैासेने करत असल्याचा प्रत्यय काल झालेल्या प्रतिपंढरपूर करहर येथील आषाढी एकादशीच्या सोहळ्यात अनेकांनी अनुभवला, आणी खऱ्या अर्थाने माझ्या सारख्या युवकांना नकळत”समाधान” देऊन गेला, माझ्या मित्राचे हे आगळे वगळे रूप पाहून मनोमन आनंद झाला असून सामाजिकतेबरोबरच सांप्रदायाची पताका मिरवणाऱ्या माझा मित्र समाधान पोफळे यांच्या कार्याला सलाम आणि शुभेच्छाही.

जावळी तालुक्यातील तीर्थक्षेत्र प्रतिपंढरपूर करहर नगरीत यंदाच्या वर्षीही आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या
दर्शनासाठी हजारो वैष्णवांचा मेळा जमला होता. टाळम्रदुंगाचा गजर आणि हरीनामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर
दुमदुमुन गेला. करहरच्या बाजारपेठेला भक्तीचा जणू महापूरच आलेला याच भक्तीच्या महापुरात समाधान पोफळे
यांनी त्यांच्या वालुथ येथील दिंडींचे जे प्रतिनिधीत्व केले, ते एवढ्या मोठ्या गर्दीतून सुध्दा ठळकपणे उठून दिसले,
अतिशय शिस्तबध्द पध्दतीने वारीतील दिंडीचे नियोजन, उत्साह, चैतन्य यावेळी दिसून आला.त्यांच्या या कार्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ बाबा शिंदे ,बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, यांच्यासह अजय शिर्के, संदीप निकम, रणजीत शिंदे, शुभम महामुलकर, राजू महाडिक, जीवन भोसले अमित शिंदे ,तुषार तरडे या अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.

वास्तविक समाधान पोफळे हे उत्तम व्यवसायिक असून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा करहर येथे बांधकाम साहित्य विक्रिचा
व्यवसाय आहे, व्यवसायात चांगला जम बसवत ते अल्पावधीतच एक उद्योजक म्हणून नावारूपाला आलेले आहेत,व्यवसाय करताना गावाची व समाजाची बांधिलकी जोपासण्याचे व्रतही त्यांनी हाथी घेतले असून समाजकारणाला राजकारणाची जोड देताना त्यांनी वालुथ गावचे सरपंच पद भुषविले आहे, केवळ सरपंच पदावरच त्यांनी न थांबता जावली तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्षपदीही त्यांनी कामा केले, तालुक्यातील अनेक सरपंचांचे नेतृत्व करत त्यांनी स्वताचे नेतृत्व सिध्द केले आहे, अशा राजकारणी व व्यवसयिक व्यक्तीमत्वाचा काल एक नवे रूप
आषाढीच्या सोहळ्यात आम्हाला अनुभवयास मिळाले, वारकरी संप्रदायातील तरुण पिढी म्हणून या युवा वारकऱ्याचे काल दर्शन घडले, कीर्तन, भजन आणि प्रवचनांच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणण्याचे एक वेगळे कसब त्यांनी दाखवून दिले, सामाधान सारखा युवा वारकरी सामाजिक कार्यातही सक्रिय असतात. ते गरजू लोकांना मदत करतात, पर्यावरण संवर्धनासाठी काम करतात आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील असतात, हा युवा वारकरी, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम करताना यानिमित्ताने दिसत आहे , ते समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही पहावयास मिळत आहे. समाधान पोफळे सारखा युवा वारकरी, इतर तरुणांसाठी एक प्रेरणास्थान आहेत. त्यांनी वारकरी संप्रदायाच्या विचारधारेचा अमूल्य ठेवा जोपासला आहे. समाधान म्हणजे मित्र परिवार संघटनेच्या माध्यमातून सतत लोकांच्या हाकेला धावून जाणारे युवा नेतृत्व आहे, अगदी कमी वयात समाधान यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे. समाधान यांना मी तसं पाहतोय ते सर्व
जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन त्याच बरोबर एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील
राजकीय नेत्याची आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अगदी कमी वयात यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे. ‘वारकरी संप्रदाय सारख्या चळवळींमधून काम करत वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि विकास अधिक प्रभावीपणे राबवणाऱ्या माझ्या मित्राला खुप खुप शुभेच्छा.राम कृष्ण हरी
शब्दांकन – महेश बारटक्के, कुडाळ






