
कुडाळ दिनांक 12- (प्रतिनिधी)- भाजपाचे जेष्ठ नेते, उच्चतंत्र शिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री मा.ना. चंद्रकांत दादा पाटील यांचेवर पुणे येथे झालेला शाई फेक हल्ला व त्याला ताकद देणाऱ्या राजकीय व सामाजिक प्रवृत्त्या यांचा निषेध करण्यासाठी भाजपा जावली कडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करून , निषेध मोर्चा काढत माननीय जावली तहसीलदार सो यांना निवेदन देण्यात आले.

भाजपा तालुकाअध्यक्ष श्रीहरी गोळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता., तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मेढा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमून हल्लेखोर गुंडप्रवृत्ती विरोधात घोषणाबाजी देऊन निषेध नोंदवला.

यावेळी मेढा नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग बापू जवळ, भाजपा नगरसेवक विकास देशपांडे , जिल्हा ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षा गिताताई लोखंडे, तालुका सरचिटणीस किरण भिलारे, मेढा शहरअध्यक्ष विनोद वेंदे, तालुका उपाध्यक्ष गणेश पवार, सरचिटणीस प्रविण गाढवे, अविनाश कारंजकर, चद्रकांत क्षिरसागर, विनायक पुसेगावकर, महिला मोर्चा अध्यक्षा वैशाली सावंत, संतोष वारागडे, सदाशिव जवळ, आदी भाजपा व हिंदूत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.


