कुडाळ ता. 27 – जावळी तालुक्यातील नावाजलेल्या व सर्वसामान्यांची पतसंस्था अशी ओळख असलेल्या कै.लालसिंगराव शिंदे सहकारी पतसंस्था मर्यादित, कुडाळ या पतसंस्थेची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील दत्तकृपा गजानन मंगल कार्यालय,कुडाळ येथे बुधवार (दि.28) दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती पतसंस्थेचे व्यवस्थापक अशोक साबळे यांनी दिली आहे.
पतसंस्थेचे अध्यक्ष सैारभ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेला पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ, प्रतापगड कारखानाचे सर्व संचालक मंडळ तसेच जावली सहकारी खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक तसेच पतसंस्थेचे सर्व सभासद, खातेदार, तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने पतसंस्थेच्या सहकारी वर्षाचा अहवाल, ताळेबंद सादर करण्यात येणार आहे. तरी सर्व सभासदांनी सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने श्री शिवणकर यांनी केले आहे.