क्रिडाजिह्वाराज्य

लॉन टेनिस स्पर्धेत वरद पोळ चे यश : राष्ट्रीय संघातही स्थान निश्चित

कुडाळ ता .२- क्रीडा व युवक सेवा संचलनालाय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, लातूर द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय लॉन टेनिस क्रीडा स्पर्धा ता. २४ ते २६ रोजी लातूर येथे पार पडल्या. साताऱ्यातील छ. शाहू अकॅडमी चा विध्यार्थी वरद संतोष पोळ (ईयत्ता १०वी) याने, १७वर्षा खालील गटात कोल्हापूर विभागातर्फे प्रथम स्थानाचे प्रतिनिधित्व केले आणि तृतीय क्रमांक पटकावला. वरद ने राष्ट्रीय संघात आपले स्थान निश्चित केले. प्रशिक्षक पार्थ चिवटे, विनायक कुलकर्णी , सर्बियन कोच मिलॉस यांनी त्याला टेनिस चे प्रशिक्षण दिले, त्याचबरोबर वरद हा सध्या पी वाय सी हिंदू जिमखाना पुणे येथे टेनिस चे प्रशिक्षण घेत आहे.
त्याच्या अथक परिश्रमाने आणि खेळातील सातत्याने त्याला हे यश मिळाले.


शाहू अकॅडमी च्या सर्वेसर्वा सौ. वेदांतीकाराजे भोसले, मुख्याध्यापिका मा. सौ. डिम्पल जाधव , क्रीडा शिक्षक श्री मोरे यांचे देखील त्याला मार्गदर्शन लाभल .नितीन तारळेकर, सातारा जिल्हा टेनिस असोसिएशन चे सर्व पदाधिकारी यांचे देखील सहकार्य लाभले. पुढे होणाऱ्या नॅशनल टुर्नामेंट स्पर्धेतही वरद पोळ हा महाराष्ट्रा तर्फे खेळनार असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button