जावळीराजकीय

स्वताचा खिसा गरम करून तोडपाणी करणाऱ्या सदाशिव सपकाळ यांचा निवडणुकीतील हा धंदा जावळीतील जनतेला नविन नाही – आमदार शिवेंद्रराजे यांचा हल्लाबोल ; म्हसवे गटातील सांगता सभेवेळी सैारभ शिंदेंचाही विरोधकांवर घाणाघात

कुडाळ ता. 19 – प्रतापगड व अजिंक्यतारा कारखान्याविषयी बोलण्याआधी ग्लुकोज कारखान्यासाठी आपणआजपर्यंत कीती निधी आणला, असा सवाल करून कोणतीही निवडणुक आली की, स्वताचा खिसा गरम करून तोडपाणी करणाऱ्या सदाशिव सपकाळ यांचा हा निवडणुकीतील धंदा जावळीतील जनतेला नविण नाही, त्यामुळे खोट्या भाषणबाजीला जावलीतील जनता भुलणार नसून, मला मी केलेल्या विकासकामांवर व मला मानापासून साथ देणाऱ्या माझ्या जावलीच्या जनतेवर विश्वास असल्याने माझा विजय नक्की असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

म्हसवे जिल्हा परिषद गटातील प्रचाराची सांगता सभा कुडाळ ता.जावली येथे नुकतीच पार पडली त्यावेळी आमदार भोसले बोलत होते, दोन दिवसांपुर्वी कुडाळ येथील जाहीर सभेत विरोधकांनी केलेल्या आरोपांना प्रतिउत्तर देताना आमदार भोसले यांनी सदाशिव सपकाळ व अमित कदम यांच्यावर टिकेची चांगलीच झोड उठवली, पुढे भोसले म्हणाले, प्रतापगड कारखाना सहकारात टिकवण्यासाठी व वाचवण्यासाठी सैारभ शिंदे यांच्या कुटुंबाचे मोठे योगदान आहे. सदाशिव सपकाळ यांनी सैारभ शिंदे यांच्यावर टिका करताना ग्लुकोज कारखान्याचे काय झाले याचे आधी उत्तर द्यावे, अजिंक्यतारा कारखान्याच्या काट्याविषयी आरोप करताना आपला स्वताचा उस आहे का, असेल तर आरोप करण्यापेक्षा ते सिध्द करून दाखवायची धमक आहे का असे आवाहनही केले. अमित कदमांवर बोलताना म्हणाले, प्रतापगड कारखाना बंद होता तेव्हा तुम्ही सगळी मंडळी कुठे होता, कारखाना सूरू करण्यासाठी आपण काय काय प्रयत्न केले हेही जनतेला कळले पाहीजेत, काडीचेही काम न करता केवळ आरोप करायचे व दिशाभूल करायची एवढच काम विरोधकांनी केले असून अशा कत्यर्व्यशून लोकांना कायमचे हद्दपार करा असेही त्यांनी सांगितले,

यावेळी सैारभ शिंदे बोलताना म्हणाले, ग्लुकोज कारखाना कोणत्या उदेशाने सूरू केला , तो उद्देश साध्य झाला आहे का, केवळ सभासदांचे पैसे घेऊन स्वताचा स्वार्थ साधला हे आधी जनतेला सांगा, तसेच तुम्हाला कारखाना सूरू करायचा नसेल तर सभासदांचे पैसे व्याजासकट परत करा आणि मगच इतरांच्या संस्थेवर आरोप करा, स्व.काका स्व.भैयांनी उभा केलेल्या संस्था त्यांच्य पाश्चातही आजही दिमाखात सूरू आहेत, आणि भविष्यातही राहणार आहेत, या संस्थांकडे वाकड्या नजरेने बघण्याआधी दहा वेळा विचार करा, तुम्ही कीतीही विरोध करा मी त्याला सामोरे जायला तयार आहे, असा सज्जड इशारही त्यांनी यावेळी विरोधकांना दिला, यावेळी कार्यक्रमास जेष्ठ नेते वंसतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेवजी रांजणे, प्रतापडचे अध्यक्ष सैारभ शिंदे, सभापती जयदिप शिंदे, शिवाजीराव मर्ढेकर, सभापती सैा, अरूणा शिर्के, माजी उपसभापती, हणमंतराव पार्टे, दत्ता गावडे, एकनाथ आोंबळे,रविंद्र परामणे, सयाजी शिंदे, मालोजीराव शिंदे, सुहास गिरी, तानाजी शिर्के, संदिप परामणे, अजय शिर्के, यांच्यासह अनेक मान्यवर, महिला, उपस्थित होते. संदिप परामणे यांनी प्रास्ताविक केले तर एकनाथ आोंबळे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button