कुडाळ ता. 26 – पक्षांतरामागे केवळ सत्तेचे पद मिळणे यापलिकडे दुसरी काही प्रबळ इच्छा नसून, महिन्यात 3 पक्ष बदलणाऱ्या तकलादू नेतृत्वामुळे जावळीचे काहीही भले होणार नाही याची जनतेला पुर्ण खात्री असून, अशा
प्रवृत्तींना जावलीतील जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असा खरमरीत टोला प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सैारभबाबा शिंदे यांनी अमित कदम यांचे नाव न घेता प्रचारसभेत बोलताना लगावला.
सोनगाव ता.जावळी येथे कुडाळ जिल्हा परिषद गटातील कार्यकत्यांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते शिंदे बोलत होते, यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, जावली बाजार समितीचे सभापती जयदिप शिंदे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदिप पवार, माजी सभापती राजेंद्र शिंदे, माजी उपसभापती हणमंतराव पार्टे, मालोजीराव शिंदे, बाजार समितीचे संचालक मच्छिंद्र मुळीक, विरेंद्र शिंदे, एकनाथ रोकडे, मचिंद्र क्षिरसागर, एकनाथ रोकडे, संदिप परामणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना शिंदे म्हणाले, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गेल्या दहा वर्षात उभा केलेला विकासाचा डोंगर येथील जनतेने पाहिला आहे,राजकारणासह , सहकार व सामजिक क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान असून त्यांना निवडून आणण्यासाठी गटातील सर्व कार्यकर्ते यापुढील प्रत्येक दिवस जिवाचे रान करतील व त्यांचा विजय अधिक दैदिप्यमान करतील.
जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे बोलताना म्हणाले, शिवेंद्रसिंहराजे हे दिलेला शब्द प्रामाणिकपणे पाळतात त्यामुळे ‘शब्द हेच प्रमाण व नेतृत्व म्हणजे फक्त शिवेंद्रसिंहराजेच’ हेच तालुक्याचे समिकरण आहे. बाजार समितीचे सभापती जयदिप शिंदे बोलताना म्हणाले, या मागील निवडणुकीत कुडाळ गटात जे काय झाले ते विसरून जाऊन या निवडणुकीत दोन्ही निवडणुकींची भरपाई करीत एक संघपणे गट-तट बाजूला ठेवून शिवेंद्रसिंहराजेंना निवडून आणण्यासाठी गटातील सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे गाव,बूथ पातळीवर सक्षमपणे प्रत्येकाने आपापली जबाबदारी सांभाळून काम करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी अनेक मान्यवर व कार्यकर्ते यांनी आपली मते मांडून शिवेंद्रराजेंना मताधिक्कयाने निवडून आणण्याचा निर्धार केला, मचिंद्र मुळीक यांनी स्वागत केले तर नाना पवार यांनी आभार मानले,