जावलीच्या चैाफेर विकासाची पोहोचपावती जावलीची जनता मताधिक्कयाने देईल – सैारभबाबा शिंदे : शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कुडाळला युवक कार्यकर्त्यांची बैठक संपन्न
कुडाळ ता. 24 – गेल्या दहा वर्षात जावली तालुक्यातील प्रत्येक गावागावात वाडी वस्तीमध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून कोट्यावधींची विकासकामे झाली आहेत, जावलीच्या शेतकऱ्यांची अस्मिता असलेला प्रतापगड कारखानाही आमदार भोसले यांच्या मुळेच पुन्हा सूरू झाला त्यामुळे केवळ राजकीय नव्हे तर, सहकार क्षेत्रातही बाबाराजेंचे योगदान मोलाचे ठरले आहे, सजग लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेल्या जावलीच्या चैाफेर विकासाची पोहोचपावती जावलीची जनता मताधिक्कय देऊन नक्की देईल असे मत प्रतापगड साखर कारखान्याचे अध्यक्ष सैारभबाबा शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले.
सातारा जावली विधानसभा मतदरासंघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कुडाळ ता.जावली येथील युवक कार्यकर्त्यांची नियोजन बैठक प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सैारभबाबा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करम्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते, यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती राजेंद्र शिंदे, कुडाळचे माजी सरपंच जितेंद्र शिंदे, कुडाळ विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष मालोजीराव शिंदे, उपाध्यक्ष काशिनाथ शेवते, ग्रामपंचायतीचे सदस्य धैर्य़शिल शिंदे, प्रतापगडचे संचालक आनंदराव मोहिते, विजय शेवते, दिनेश किर्वे, शाबिर पठाण, विजय कुंभार, अमोल शिंदे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, सोसायटीचे संचालक, ग्रामस्त व युवक मोट्या संख्येने उपस्थित होते,
जितेंद्र शिंदे बोलताना म्हणाले, कुडाळ हे तालुक्यातील सर्वात मोठे मतदानाचे गाव असून आमदार शिवेंद्रराजे यांना मोठे मताधिक्कय देण्यासाठी सर्वांना एकत्रित घेऊन काम करण्यात येईल, यावेळी राजेंद्र शिंदे, मालोजिराव शिंदे, आदींनीही मनोगत व्यक्त करून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मोठे मताधिक्य देण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी महेश बारटक्के यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.