जावळीसहकार

शेतकर्यांची “दिवाळी होणार गोड” – प्रतापगड- अजिंक्यतारा कारखान्याकडून दिवाळीनिमित्त आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते साखर वाटपाचा उद्यापासून शुभारंभ – साैरभ शिंदे यांची माहीती

कुडाळ ता.15 – जावळीच्या सहकाराचा मानबिंदू म्हणून आोळख असलेला व जावळीतील जनतेच्या हक्काचा असणारा प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सन 2024-25 साठी अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योग समुहाच्या वतीने कारखान्यामार्फत सभासद व ऊस उत्पादकांसाठी प्रतिवर्षीप्रमाणे दिपावली निमित्त कारखान्याचे मार्गदर्शक व आमदार श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार व दोन्ही कारखान्याचे मा. संचालक मंडळ सभेतील निर्णयानुसार सवलतीच्या दरात साखर वाटपाचे धोरण निश्चित केले असले असून साखरेच्या वाटपाचा शुभारंभ उद्या बुधवार ता.15 रोजी आमदाऱ शिवेंद्रराजे भोसले व मानयवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहीती कारखान्याचे चेअरमन सैारभबाबा शिंदे यांनी दिली आहे.


प्रतापगड साखर काऱाखान्याचा गतवर्षीपासून गळीत हंगाम सूरू करण्यात आला होता, मागील वर्षी उस उत्पादक व शेतकरी सभासदांनी प्रतापगड कारखान्याला मोठ्या प्रमाणात उसाचा पुरवठा करून कारखान्याचा हंगाम यशस्वी केला होता. हंगाम सूरू करतेवेळी आमदार भोसले व सैारभ शिंदे यांनी कारखाना सुरूळीत सूरू झाला की ऊसाला योग्य भाव व सवलतीच्या दरात साखर देण्याचे आश्वासन दिले होते, त्याप्रमाणे सभासदांना यावर्षी दिवाळीनिमित्त सवलतीच्या दरात साखर वाटप करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ उद्या बुधवार ता.15 रोजी सकाळी 10 वाजता आमदाऱ शिवेंद्रराजे भोसले व सैारभबाबा शि्ंदे तसेच सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. शेतकरी सभासदांनी साखर आणण्यासाठी येताना आोळखपत्र व सभासद कार्ड सोबत घेऊन येण्याचे आवाहनही व्यवस्थापनाकडून यावेळी करण्यात आले आहे. साखर वाटपाचा निर्णय जाहीर केल्याने सभासद व ऊस उत्पादक शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button