जावळी

डी एम के जावली सहकारी बँक प्रथम क्रमांकाचे मानकरी- बृहन्मुंबई बँक्स असोसिएशन मुंबईचा व्यवसायातील पुरस्कार प्रदान

कुडाळ ता. 8 – जावली महाबळेश्वर तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या डी एम के जावली सहकारी बँकेला दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशन मुंबईचा यावर्षीचा उत्कृष्ट व्यवसायाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार
मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डी एम के जावली सहकारी बँकेचे अध्यक्ष विक्रम भिलारे व संचालक मंडळांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची ही पोचपावती असून संचालक मंडळावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांचें हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशनने आपल्या सभासद बँकांकरिता सन २०२३-२०२४ अहवाल व कामकाज संदर्भात स्पर्धाआयोजित केलेली होती. सदर आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी सभासद बँकांचे रूपये २५० कोटी पर्यंतएकूण व्यवसाय असणाऱ्या बँकांचा गट, २५१ ते १००० कोटी पर्यंत एकूण व्यवसाय असणाऱ्या बँकांचा गट, १००१ ते ५००० कोटी पर्यंत व्यवसाय असणाऱ्या बँकांचा गट, ५००१ कोटी वत्यापेक्षा जास्त एकूण व्यवसाय असणाऱ्या बँकांचा गट व पगारदार नोकरांच्या बँकांचा गट असे पाच गटतसेच रिझर्व बँकेच्या सर्वसमावेशक निर्बंधामधून (35A) बाहेर पडणाऱ्या बँकेला विशेष पुरस्कार ठरविण्यात आलेले होते. या स्पर्धेत डी एम के जावली सहकारी बँक १००१ ते ५००० कोटी पर्यंत व्यवसाय असणाऱ्या बँकांच्या गटात प्रथम क्रमांकाने विजयी झाली आहे बँकेचे अध्यक्ष विक्रम भिलारे उपाध्यक्ष चंद्रकांत दळवी व संचालक मंडळाने बँकेच्या अत्यंत कठीण काळात जिद्दीने आणि सभासदांचे हीच जोपासत तसेच सभासदांनी त्यांच्यावर टाकलेल्या जबाबदारीचे भान ओळखून कठोर मेहनत घेतली. रिझर्व बँकेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत बँकेला नाजूक परिस्थितीतून बाहेर काढून ठेवींचा व व्यवसायाचा टप्पा पार केला आहे.

दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक असोसिएशन ने आयोजित केलेल्या स्पर्धेत खडतर मेहनत करत डी एम के जावली सहकारी बँकेने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला असून हे सर्व श्रेय माझ्या संचालक मंडळातील सहकारी माजी अध्यक्ष चंद्रकांत गावडे, प्रकाश मस्कर, योगेश गोळे यांच्याबरोबरच आमचे सर्व आजी माजी संचालक,अधिकारी,कर्मचारी व ज्या सभासदांनी बँकेवर विश्वास ठेवून बँकेला व्यवसाय दिला त्यांचे आहे अशी प्रतिक्रिया बँकेचे अध्यक्ष विक्रम भिलारे यांनी दिली यावेळी जावळी बँकेचे अध्यक्ष विक्रम भिलारे, उपाध्यक्ष चंद्रकांत दळवी , संचालक संतोष कळंबे, अजित कळंबे,  विश्वनाथ धनावडे  ,वसंत तरडे , विजय दगडू कदम ,रामचंद्र चिकणे साहेब व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री लालवाणी साहेब, सरव्यवस्थापक गोविंद जाधव, उपसरव्यवस्थापक, अनिल सणस ,नामदेव बांदल, व इतर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button