जावळी : वर्षानुवर्ष जावळी तालुक्यामध्ये सुरू असणारे गल्लीबोळातील गावागावातील अवैध दारूचे गुत्ते धंदे तात्काळ पोलिसांनी बंद करावे, पोलीस यंत्रणेच्या वरद हस्ताने सुरू असणाऱ्या या धंद्यांवर कठोर कारवाई होणार नसेल तर पर्यायी कायदा हातात घेऊन हे संबंधित दारूचे अड्डे उध्वस्त आम्ही करू असा इशारा प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सैारभ शिंदे यांनी दिला आहे. एका प्रसिद्धी पत्रकात सौरभ शिंदे म्हणाले, गेले काही महिन्यापूर्वी आम्ही तालुक्यातील मान्यवरांनी मिळून जावली तालुक्यातील अवैद्य दारु धंदे बंद व्हावेत व शासन मान्यता प्राप्त दारु विक्रीचे व्यवसाय चालू व्हावेत यासाठी उठाव केला होता. हेतू स्वच्छ आणि स्पष्ट होता. त्यावेळेस सर्वांचे म्हणणे हेच होते की, अवैद्य दारु धंदे हे कधीच बंद होऊ शकत नाहीत व परिणामी शासनाचा बुडत असलेला महसुल नकली दारू, वाढत चाललेली गुन्हेगारी प्रवृत्ती, दारु सम्राट यांची मस्ती, हसेबाजी याला आळा बसणे अशक्य आहे. त्यावेळी अनेक मान्यवरांनी, काही संस्थांनी व तथाकथित समाजसेवकांनी आम्हाला विरोध केला व दारू सारख्या गोष्टीला प्रोत्साहन देत आहोत असा कांगावा केला. परंतू आजही तीच विदारक परिस्थिती जावलीमध्ये सर्वत्र दिसत आहे. सर्व अवैद्य दारू धंदे राजरोसपणे जावली तालुक्यात विभागवार चालू असलेले दिसून येत आहेत. कोणतेही गाव किंवा भाग याला अपवाद नाही. अगदी गावातील शेंबड पोरगं पण सांगेल की अवैद्य दारू धंदे कुठे चालू आहेत परंतू पोलीस प्रशासन, उत्पादन शुल्क विभाग ज्यांना गुन्हेगारी तपासणीचे शिक्षण दिले गेलेले असते त्यांना मात्र एकही धंदा हा दिवसाढवळ्याही चालू असलेला दिसत नाही ही शोकांतिका आहे.
त्यांच्या पाठबळाशिवाय हे धंदे जावलीमध्ये चालू शकत नाहीत हे त्रिकालबादी सत्य कुणीही नाकारु शकत नाही. किंबहुना आम्ही केलेल्या शासन मान्यताप्राप्त दारू दुकाने चालू झाली पाहिजेत याच्या विरोधात ज्या तथाकथित समाजसेवकांनी कारस्थान रचले त्यांना ही अवैद्य दारु धंदे करणा-या गुन्हेगारांनी वेळोवेळी रसद पुरविली व हा निर्णय हाणून पाडण्यासाठी लागेल ते चलन व यंत्रणा पुरविली असं आम्हाला वाटतं. कारण जर शासन मान्यताप्राप्त दारू दुकान चालू झाले .तर हो अवैद्य धंदे पुर्णपणे बंद पडतील व त्यातून मिळणारी काळी माया, हसेबाजी बंद होईल या लालसेपोटी हे सर्व केले अशी चर्चा तालुक्यात सर्वत्र आहे. आज राजरोसपणे अवैद्य दारु धंदयाचे पूर जावलीमधील प्रत्येक विभागात ओसंडून वाहत आहे. याला सर्वस्वी जबाबदार हे उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासन व एल सी बी विभाग आहे. पोलीस प्रशासनाने मनावर घेतले तर एकही अवैद्य धंदा हा तालुक्यात चालू राहणार नाही हे मात्र नक्की. कुडाळ, करहर, म्हसवे, सायगांव, मेढा, सोमर्डी, सरताळे, केळघर या सर्व विभागात आपले साम्राज्य समजणारे व जहागिरी वाटून घेतल्यासारखे हे सर्व अवैद्य धंदेवाल्यांची पाळेमुळे पसरली आहेत. तरी काहींनी ठिकठिकाणी शाखा काढल्या आहेत. म्हणून आम्ही सांगत होतो की अवैद्य दारु धंदयांना आळा घालण्यासाठी शासन मान्य दारू दुकाने ही जावली तालुक्यात चालू झाली पाहिजेत, तालुक्यातील दारु बंद व्हावी म्हणून त्यात्यावेळी आम्हीही आग्रहक्काने पुढाकार घेतला होता पण दारु बंदीचा सफल हेतू झाला असे आम्हाला वाटत नाही तर हप्तेबाजीला रान मोकळे झाले इथून पुढेही आम्ही शासनमान्य दारु दुकाने चालू होतील व ही अवैद्य दारु धंदे करणा-यांना आळा बसेल यासाठी प्रयत्नशील राहू व लवकरच साता-याचे एसपी समीर शेख यांची भेट घेऊन पोलीस प्रशासनाचा चाललेला गैरकारभार यावर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, भानुदास गायकवाड, नितीन दूधस्कर रामचंद्र फरांदे संदीप परामने रवींद्र परामने पांडुरंग जवळ यांनी केली आहे