कुडाळ ता.31 – आगामी गणेश उत्सव व ईद-ए- मिलाद सण-2024 हे शांततेत, सुरळीत व निर्भय वातावरणात पार पाडावेत यासाठी पूर्वतयारी करण्याच्या अनुषंगाने मा. श्री. भालचिम साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई यांच्या उपस्थितीत मेढा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील,शांतता कमिटी सदस्य, पोलीस मित्र, हिंदू व मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते, पत्रकार बंधू यांची मिटिंग पार्टे हॉल. मेढा या ठिकाणी दिनांक 30/08/2024 रोजी घेण्यात आली.
सदर मीटिंग करता नायब तहसीलदार मुनावळे साहेब, पवार साहेब, अभियंता महावितरण विभाग, पत्रकार असे उपस्थित होते.सदर मीटिंग मद्ये गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी धर्मादायुक्त सातारा यांच्याकडे मंडळाची नोंद करणे. पोलिसांनी ठरवून दिलेल्या मार्गाने व ठरवून दिलेल्या वेळेतच गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक काढावी. गणेश मिरवणूक व विसर्जन मिरवणुकीच्या वेळी महिलांची किंवा मुलींची छेडछाड होणार नाही याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक गणेश मंडळांनी सीसीटीव्ही बसावेत. सर्वांनी गणेश मंडळांनी डॉल्बीचा वापर करू नये पारंपारिक वाद्य वापरण्यास आग्रही राहावे. गणेशोत्सव कालावधी मध्ये गणेश मूर्तीच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी संबंधित मंडळाची राहील याची नोंद घ्यावी. पावसाचे दिवस असल्यामुळे मूर्तीचे संरक्षण करणे करिता मंडपात फक्त पडदे न बसवता पत्र्याचा वापर करावा. इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होऊ नये याकरिता गणेश मंडळांनी विद्युत पुरवठा निर्दोष असलेल्या बाबत महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे प्रमाणपत्र प्राप्त करावे, अशा सूचना देण्यात आल्या
तसेच मेढा पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश उत्सव अनुषंगाने विशेष उपाययोजना करिता गणेश गणराया अवॉर्ड 2024 स्पर्धेचे आयोजण केले असून जास्तीत जास्त मंडळ आणि सहभाग नोंदवावां, यामध्ये रक्तदान शिबिर घेणे ,विधवा महिलांना आरतीला मान देणे, महिलाचा सन्मान करणारे उपक्रम राबवावेत, एक गाव एक गणपती सामाजिक उपक्रम राबवणे ,गाव स्वच्छता मोहीम राबविणे,असे सर्व गणेश मंडळांना आवाहन करण्यात आले पोलीस अधीक्षक सातारा याच्या तर्फे सर्वोत्कृष्ट गणेश मंडळांना अवॉर्ड देणेत येणार आहेत. मा.पोलीस अधीक्षक सातारा यांच्यातर्फे उंच भरारी योजना प्रशिक्षणासाठी गणेश मंडळातील व गावातील तरुण युवकांनी सहभाग नोदवून स्वावलंबी व्हावे असे आवाहन केले.सदर मीटिंगला ध,सदर मीटिंगला अंदाजे 180 ते 200 गणेश मंडळाचे सदस्य, पोलीस पाटील व शांतता कमिटीचे सदस्य असे उपस्थितीत होते.