भाजपा जावलीच्या मागणीनुसार बँक ऑफ महाराष्ट्र च्या कुडाळ शाखेतील ekyc सुलभ करणार- शाखाधिकारी सरोजकुमार भगत
कुडाळ ता. २२- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकार ने जावली तालुक्यातील हजारो महिलांच्या नावावर प्रत्येकी 3000 रुपये जमा केलेले आहेत. शेकडो महिलांचे जे बँक खाते आधार लिंक आहे, अशा खात्यावर सदर रक्कम वर्ग झालेली आहे.
परंतु शेकडो महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फार्म भरताना एक बँक खाते दिलेले आहे, आणि आधार लिंक असलेले वेगळेच बँक खाते असल्याचे संबंधित महिलेचे आधार लॉगिन केल्यावर निदर्शनास आलेले आहे.
त्याचा परिणाम म्हणून कुडाळ येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत बँक खाते आधार सिडींग करण्यासाठी व ई के वाय सी करण्यासाठी रोजच्या रोज महिलांची भली मोठी रांग लागत आहे. आणि त्याचा सामान्य महिलांना नाहक आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करायला लागत आहे. भर ऊन – पावसात महिलांना बँकेत दिवसभराची कामं सोडून ताटकळत बसावे लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी भाजपा जावली तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे व भाजपा पदाधिकाऱ्यांनी कुडाळ येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखाधिकारी
सरोजकुमार भगत यांची भेट घेऊन समस्या मांडली.
यावेळी शाखाधिकारी भगत, बँकेचे बीसी सर्व्हिस सेंटर चे संदीप गोळे, भूषण शिंदे व भाजपा पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. व यातून बँक खातेदारांना त्रास होऊ नये म्हणून करहर विभागातील सर्व बँक खातेदारांनी करहर येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या बीसी पॉईंट येथील कार्यालयात आधार , पॅन कार्ड झेरॉक्स, 1 अद्यावत फोटो, मोबाईल नंबर देऊन पूर्ण फॉर्म भरून जमा करावेत. व असे रोजच्या रोज जमा झालेल फॉर्म दुसऱ्या दिवशी बँकेत जाऊन एकत्रित द्यावेत. खातेदारणा हेलपाटे मारण्याची गरज नाही. तसेच सदर जमा झालेले फॉर्म बँकेने सात दिवसाच्या आत ई केवाय सी करून द्यावी. असा निर्णय घेऊन बँक खातेदारांची ससेहेलपट होणार नाही याचे आश्वासन बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखाअधिकारी भगत यांनी दिले.
यावेळी तालुका उपाध्यक्ष भरत गोळे, अशोक शिर्के, दिघे महाराज विकास सणस,प्रकाश शंकर गोळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.