पत्रकार संघ जावळीच्या अध्यक्षपदी इम्तियाज मुजावर तर कार्यध्यक्षपदी महेश बारटक्के यांची बिनविरोध निवड- संघाची वार्षिक सभा संपन्न
कुडाळ ता. 4 – पत्रकार संघ जावळीच्या अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे पत्रकार इम्तियाज मुजावर यांची तर कार्याध्यक्षपदी दैनिक सकाळचे पत्रकार महेश बारटक्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी दत्ता पवार तर मेढा विभागाच्या उपाध्यक्षपदी सुजित धनवडे यांची तसेच खजिनदारपदी बापूसाहेब वाघ तर सचिवपदी विनोद वेंदे, सहसचिवपदी संदीप माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
कुडाळ ता.जावळी येथे पत्रकार संघ जावळी यांची वार्षिक सभा खेळीमेळीच्या व उत्साहाच्या वातावरणात पार पडलीयावेळी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांच्या एकमताने नुतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या, सभेच्या सुरूवातीस सचिव वेंदे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून पत्रकार संघाचा लेखाजोखा मांडला त्याला सर्व सभासदांनी मंजूरी देऊन नुतन पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी संघाचे मावळते अध्यक्ष वसीम शेख यांनी नुतन अध्यक्ष मुजावर यांच्या हाती पत्रकार संघाचा कारभार देऊन त्यांचा सत्कार केला.
त्यानंतर सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान संघाच्या वतीने करण्यात आला. यावेळी ऩुतन अध्यक्षांसह अनेकांनी आपली मनोगते व्यकत करून पत्रकार संघातील पत्रकार सर्व समान्य जनतेला लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळवून देतील असे अभिवचन दिले. यावेळी झालेल्या सभेस पत्रकार संघाचे सदस्य सादिक सय्यद, शहाजी गुजर, दिलीप पाडळे, विशाल जमदाडे, जुबेर शेख, सचिन वारागडे, संतोष बेलोशे, अंकुश कोकरे, शरद रांजणे, मोहसीन शेख, जुबेर शेख, प्रमोद पंडित आदी सभासद उपस्थित होते. सादिक सय्यद यांनी सर्वांचे आभार मानले.