जावळीशैक्षणिकसामाजिक

“आपुलकी”च्या सोशल दिंडीने वेधले प्रतिपंढरीचे लक्ष- अपंग व विशेष मुलांच्या वारकरी दिंडीने केली समाजजागृती

कुडाळ ता. 18 – विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठ्ल… विठ्ठल नामाची शाळा भरली…अशा अभंगात दंग झालेल्या वारकऱ्यांनी टाळमृदुंगाच्या जयघोषात चिमुरडा विठोबा व रुक्मिणी तसेच नऊवारी साडी परिधान केलेल्या मुली, पांढरे शुभ्र धोतर, शर्ट व टोपी अशा वेशात भगव्या पताका व मोबाईलचा व सोशल मिडीयाचा अतिरेक टाळा अशा आशया बाबत सामाजिक संदेश देणारे फलक हाती घेतलेले बाल वारकरी मुले, टाळ-मृदंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करत प्रतिपंढरपूर करहर नगरीत पाचवड येथील आपुलकी मतिमंद शाळेतील अपंग व मतिमंद (विशेष) विद्याथ्यार्नी आषाढी एकादषीच्या निमित्ताने सोशल दिंडी काढून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या करहर ता. जावळी येथे हजारो भाविक आषाढीला येतात, पाचवड येथील आपुलकी मतिमंद मुलांच्या शाळेतील विध्यार्थी ही प्रत्येक आषाढीला करहर येथे जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात, या बालवारकर्यांनी आपल्या शाळेची परंपरा कायम ठेवत पाचवड -कुडाळ ते करहर अशी आषाढीच्या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीची वेशभूषा धारण करून टाळ, मृदंग, लेझिमच्या गजरात गावातून दिंडी काढली. तसेच यावेळी सामाजजागृती करताना मोबाईल सह सोशल मिडीया, फेसबुक, वाँटसँप, इन्स्टाग्राम, युट्युबसह मोबाईलवरील विविध प्रकारचे अँप च्या अतिवापरामुळे लहान मुलांवर होणारे दुष्परिणाम, याबाबत पटनाथ्य सादर करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला, यावेळी मोबाईल चा वापर हा गरजेपेक्षा जास्त होऊ लागल्याने त्यामुळे होणारे नुकसान, वेळेचा अपव्यय, आदींबाबत मुलांनी सादरीकरनातून समाजजागृती केली.

यावेळी विद्याथ्यांनी सामाजिक संदेश देणारे फलकही हातात घेतले होते या दिंडीने गावात भक्तिमय वातावरण तयार झाले .यावेळी दिंडीत 50 हून अधिक (विशेष) विध्यार्थींनी सहभाग घेतला संस्थेच्या संस्थापिका सैा. सुषमा पवार यांनी यावेळी विद्यार्थांना संतांचे महात्म्य सांगितले. मुख्याध्यापिका श्रीमती नलिनी गायकवाड यांनी दिंडीचे सुयोग्य नियोजन केले. यावेळी मनसोपचार तज्ञ, सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी उपस्थित होते, कुडाळ, करहर ग्रामस्थांच्या वतीने मुलांनाखाऊवाटपही करण्यात आला.

“आपुलकी”च्या सोशल दिंडीचा खालील व्हीडीआो आवश्य पहा ……….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button