कुडाळ ता. 3 – महाराष्ट्रात माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. या योजनेबाबत महिलांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिलांची गर्दी होत असल्याने सातारा जावलीचे कार्यसम्राट आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्यांना आवश्यक ती माहीती सांगून पात्र सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळाला पाहीजेत तसेच कोणीही या योजनेपासून वंचित राहू नये त्यासाठी प्रशासनाने योग्य ते सहकार्य करावे व योजना जावली तालुक्यात यशस्वीपणे राबवावी असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी यावेळी बोलताना केले.
मेढा ता.जावळी येथे दिनांक 3 जुलै 2024 रोजी पंचायत समिती जावलीच्या सभागृहामध्ये खास महिलांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आमदार शिवेंद्रराजेंच्या सूचनेनुसार ही योजना महिलांना समजून सांगण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते त्यावेळी गटविकास अधिकारी श्री मनोज भोसले साहेब श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेब, मंडलाधिकारी मुळीक साहेब, विस्ताराधिकारी जवळवाडी चे सरपंच डॉक्टर सतीश मर्ढेकर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. श्री रांजणे साहेबांनी महिलांना कागदपत्रा संदर्भात असलेला भ्रम दूर करून सोप्या पद्धतीने कोणकोणती कागदपत्रे लागतील जास्तीत जास्त पात्र कसे ठरतील.या विषयी मार्गदर्शन केले.कोनीही वंचित राहु नये याची काळजी घ्यावी.
कशाप्रकारे कागदपत्रे दाखल करता येतील, अंगणवाडी सेविका आशा सेविका, तलाठी, ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार मधील सेतू अशा विविध ठिकाणी कागदपत्रे जमा करता येतील 30 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिलेली असल्या कारणाने कोणीही गोंधळून जाऊ नका घाई गडबड करू नका असे आवाहनही भाजपाचे नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय श्री ज्ञानदेव रांजणे साहेब यांनी यावेळी केले यावेळी मेढा नगरपंचायतचे नगराध्यक्ष पांडुरंग जवळ उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार माजी बांधकाम सभापती श्री विकास देशपांडे ,श्री शिवाजीराव गोरे ,संजयजी सपकाळ, संजयजी सुर्वे, श्री सागर जी धनावडे ,दत्तात्रय वारागडे ,सौ गीता ताई लोखंडे,तलाठी श्री शंकर सावंत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते महिला बहुसंख्येने यावेळी उपस्थित होत्या आणि गावोगावी कॅम्प लावून प्रशासनाने सहकार्य करावे आणि प्रत्येक लाभार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल या दृष्टीने प्रशासनाने काम करावे असे सूचना आदरणीय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्या.