जावळीशैक्षणिकसामाजिक

शिक्षण हाच प्रगतीसह उन्नतीचा भक्कम पाया – किरण बगाडे : जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

कुडाळ ता. 24 – सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे उघडी केली त्यांनी स्वतच्या अंगावर दगड शेण्या झेलून महिला वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहात आणले. चूल आणि मूल यात अडकून न राहता मुलगी शिकली तरच तीच घर घडवू शकते महिला शिक्षणामुळे महिला राष्ट्रपती,मंत्री खासदार,आमदार,या अनेक उच्च पदावर कार्यरत आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेन तो गुर्गुरल्याशिवाय राहणार नाही असा कानमंत्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिला शिक्षणामुळे आपल्याला हक्क आणि अधिकार प्राप्त होतात त्यामुळे शिकल पाहिजे. स्वतः मला परिस्तिथी मुळे शिकता आले नाही त्यामुळे त्याचीच उणीव मनात धरून तळागाळातील, सर्वसामान्य कुटुंबातील,वंचित घटकामधील मुलांना परिस्तिथी मुळे शिकता येत नाही भटके विमुक्त जाती मधील मुलांना शिक्षणाची आवड आणि गोडी निर्माण व्हावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे जिल्हा सचिव आयु.किरण बगाडे यांनी सामजिक बांधिलकी जोपासत आपण ही समाज्याचे काहीतरी देणं लागतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून किरण बगाडे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलावडे शाळेतील मुलांना मोफत वह्या वाटप पेन वाटप तसेच अंगणवाडी मधील मुलांना सकस खारीक वाटप करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक दळवी मॅडम,पालकर मॅडम,अंगणवाडी सेविका अश्विनी शिंदे तसेच अजित शिंदे अनिल शिंदे, सनी बगाडे, महिला ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते

त्याच बरोबर सलग पाचव्या वर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निम्मित जिल्हा किरण बगाडे सामाजिक बांधिलकी जपत यांनी परिषद प्राथमिक शाळा बेलावडे, जि.प.प्राथमिक शाळा आखाडे, जि.प.प्राथमिक शाळा सनपाने, जि.प.रासाई नगर,आखाडे फाटा, या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच करंदी तर्फे कुडाळ, म्हसवे मधील आंबेडकर नगर मधील सर्व मुलांना मोफत वह्या आणि पेन वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button