कुडाळ ता. 28 – ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीद असलेल्या स्वामी विवेकानंद शिक्षण
संस्थेचे महाराजा शिवाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज कुडाळ ता. जावली, या विद्यालयाचा इयत्ता दहावीचा 2023-2024 या सालचा निकाल ९८.६६ टक्के लागला आहे. इयत्ता दहावीसाठी एकूण 75 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 74 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जावली तालुक्यात या शाळेचा निकाल सर्वोत्कृष्ट लागल्याने शिक्षक, विद्यार्थी तसेच पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळाले.
विद्यालयाची इयत्ता दहावीच्या निकालात यशाची परंपरा कायम ठेवत मार्च 2024 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे 20 विद्यार्थी आहेत तर 80 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे 18 विद्यार्थी आहेत, 70 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे 18 विद्यार्थी आहेत तर 40 ते 60 टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी 18 आहेत त्यामुळे यावेळचा निकाल हा संख्यात्मक नसून गुणात्मक लागलेला आहे त्याचे गुणानुक्रम पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक पवार जान्हवी संतोष 96.00%
तर द्वितीय क्रमांक पवार देवांग प्रदीप 95.20% आणि मणेर सुहान जावेद 95.20% तर तृतीय क्रमांकजाधव वेदांत विकास 95.00% मिळवून उत्तीर्ण झाले, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचा सेमी माध्यमाचा 100% निकाल तर मराठी माध्यमाचा 94.77% निकाल लागला आहे कला, क्रीडा व NNMS स्कॉलरशिप, चित्रकला ग्रेड परीक्षा यामध्ये उज्ज्वल यशाची परंपरा विद्यालयाने कायम ठेवली आहे. या यशात प्राचार्य सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी शालेय सल्लागार व विकास समिती, शाळा व्यवस्थापन समिती, कुडाळ व पंचक्रोशीतील ग्रामस्थ आदींचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे दत्तात्रय तरडे यांनी सांगितले.