क्रिडाजावळी

“कुडाळ सुपर प्रो लीग” चा शनिवार पासून थरार – बक्षिसांचा धमाका : सैारभ शिंदे युवा मंचच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन – युवावर्गाची उत्कंठा शिगेला

कुडाळ ता. 23 – जावली तालुक्यातील कुडाळ येथे कुडाळ सुपर प्रो लीग या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सैारभ शिंदे युवा मंचच्या वतीने तालुक्यात पहिलांदाच करण्यात आले असून शनिवार ता. 25 मे व रविवार ता. 26 मे रोजी कुडाळ येथील पिंपळेश्वर मंदिरा शेजारी असणाऱ्या पाटलांचा मळा या मैदानावर या स्पर्धा होणार असल्याची माहीती आजोकांकडून देण्यात आली आहे.

या स्पर्धेमध्ये कुडाळ गावातील एकूण सहा संघांचा समावेश करण्यात आला असून या स्पर्धेतून प्रथम व द्वितीयक्रमांक काढण्यात येणार आहेत, प्रथम विजेत्या संघास प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सैारभ शिंदे यांच्या सैाजन्याने 21 हजारांचे रोख पारितोषिक तर द्वितिय विजेत्या संघास योगेश कुंभार व अतुल बावकर यांच्या सैाजन्याने 11 हजारांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच निलेश पवार व अमोल शिंदे यांच्या सैाजन्याने विजेत्या संघांना आकर्षक चषकही देण्यात येणार आहे. त्या व्यतिरिक्त मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक, विकेट हॅट्रिक, मॅन ऑफ द मॅच अश्या वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही विविध आकर्षक बक्षिसे दिले जाणार असल्याचे स्पर्धेच्या आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

कुडाळ सुपर प्रो लीग या क्रिकेट स्पर्धेसाठी पुढीलप्रमाणे संघांची निश्चिती करण्यात आली असून त्यामध्ये 1) कुडाळ पँथर्ससाठी संघमालक रोहित पवार व अभिजित शिंदे तर आयकॉन नासीर नदाफ व कॅप्टन नागेश पवार यांची 2) लंबोदर सुपरकिंग्जसाठी संघमालक ऋषी शिंदे, आयकॉन श्रेयश बोराटे, कॅप्टन राम बोडरे यांची 3) प्रतापगड फायटर
साठी संघमालक अमोलभाऊ शिंदे, प्रफुल्ल शिंदे, आयकॉन नितीन कुंभार, कॅप्टन अभी ननावरे यांची 4) पिंपळेश्र्वर वॉरियर्ससाठी संघमालक संदीप पवार, अतुल पवार, आयकॉन सचिन पवार , कॅप्टन किरण मोरे यांची 5) सह्याद्री चॅलेंजर साठी संघमालक प्रवीण मोरे, इम्तियाज मुजावर , आयकॉन प्रकाश मानकुमरे, कॅप्टन समीर मोरे यांची 6) गोल्डन 11 साठी
संघमालक दिनेश कीर्वे, आयकॉन साहिल पटेल, कॅप्टन निखिल गुरव यांची निश्चिती झाल्याने स्पर्धेत असे एकूण सहा संघ सहभागी झाले आहेत.

तालुक्यात पहिल्यांदाच भरवण्यात आलेल्या कुडाळ सुपर प्रो लीग या क्रिकेट स्पर्धेसाठी जावली तालुक्यातील क्रिडा क्षेत्रातील युवकांकडून कौतुक होत असून सर्वांनाच स्पर्धेची उत्कंठा लागून राहीली आहे, या स्पर्धेचे थेट प्रसारण युट्यूब चँनेल वर देखील करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी कुडाळ ग्रामस्थांसह गावातीस सर्व तरूण मंडळांचे व युवा वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button