कुडाळ ता.10 – एशियन टेनिस फेडरेशनतर्फे आयोजित केलेल्या, १६ वर्षाखालील वयोगटातील लॉन टेनिस स्पर्धेत सातारा येथील छ. शाहू अकॅडमीचा विद्यार्थी चि. वरद संतोष पोळ याने भारता तर्फे खेळून दुहेरी सामन्यात प्रथम स्थान पटकावले.
ता. २९ जानेवारी २०२४ ते २ फेब्रुवारी २०२४ दरम्यान गुरुग्राम, हरियाणा येथे लॉन टेनिस स्पर्धा पार पडल्या. त्यावेळी वरद पोळ याने भारता तर्फे खेळून दुहेरी सामन्यात प्रथम स्थान पटकावले. वरद हा पुणे येथे प्रशिक्षक श्री. प्रसूनजीत पॉल यांच्याकडे टेनिसचे प्रशिक्षण घेत असून त्याच्या अथक परिश्रमाने आणि खेळातील सातत्याने त्याला हे यश मिळाले.
छ. शाहू अकॅडमीच्या सर्वेसर्वा सौ. वेदांतीकाराजे भोसले, मुख्याध्यापिका सौ. डिम्पल जाधव, क्रिडा शिक्षक श्री.कदम यांच्यासह सातारा लॉन टेनिस असोसीएशनचे अध्यक्ष राजेंद्र पवार व सेक्रेटरी व्यंकटेश साळुंखे आदींचेही त्याला मार्गदर्शन लाभले. त्याच्या दैदीप्यमान यशाबद्दल त्याचे सर्व क्षेत्रातून कैातुक होत आहे.